नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:27 IST2025-12-16T14:27:18+5:302025-12-16T15:27:45+5:30
गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबचे सह-मालक आहेत. आग लागल्यानंतर ते लगेचच थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले. त्यांच्याविरुद्ध इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
गोवा नाईट क्लब आगीतील आरोपी लुथरा बंधूंना मंगळवारी दिल्लीत आणले. ६ डिसेंबर रोजी नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर ते थायलंडला पळून गेले होते.
गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबचे सह-मालक आहेत. आग लागल्यानंतर ते लगेचच थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले. त्यांच्याविरुद्ध इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर, थाई अधिकाऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी फुकेतमधील लुथ्रा बंधूंना ताब्यात घेतले. या प्रकरणाबाबत भारतीय दूतावास थायलंड सरकारशी सतत संपर्कात आहे.
ऑनलाइन शेअर केलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये थायलंडला जाण्यापूर्वी लुथरा बंधू बँकॉक विमानतळावर दिसले. भारतात आल्यानंतर, त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवले. गोवा पोलिसांनी आगीच्या घटनेसंदर्भात आधीच पाच व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.