भारीच! कंपनी असावी तर अशी; चांगल्या कामाचा मोबदला म्हणून तरुणाला थेट चंद्रावरच दिली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:44 PM2021-04-02T16:44:54+5:302021-04-02T17:02:37+5:30

Land On Moon : अमेरिकेची कंपनी लूनार सोसायटी इंटरनेशनल (Lunar Society International) ने रहमानीला चंद्रावर त्याने केलेल्या उत्तम कामाचा मोबदला म्हणून ही जमीन दिली आहे.

Lunar Society International iftekhar gifted land moon american company | भारीच! कंपनी असावी तर अशी; चांगल्या कामाचा मोबदला म्हणून तरुणाला थेट चंद्रावरच दिली जमीन

भारीच! कंपनी असावी तर अशी; चांगल्या कामाचा मोबदला म्हणून तरुणाला थेट चंद्रावरच दिली जमीन

Next

नवी दिल्ली - चांगल्या कामाचा मोबदला म्हणून एका कंपनीने तरुणाला थेट चंद्रावरच जमीन दिली आहे. बिहारच्या दरभंगा (Darbhanga) जिल्ह्यातील एका छोट्या गावचा रहिवासी असलेल्या इफ्तेखार रहमानी या तरुणाला आता चंद्रावर एक एकर जमीन गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे. अमेरिकेची कंपनी लूनार सोसायटी इंटरनॅशनलने (Lunar Society International) रहमानीला चंद्रावर त्याने केलेल्या उत्तम कामाचा मोबदला म्हणून ही जमीन दिली आहे. लूनार सोसायटी इंटरनॅशनल ही कंपनी चंद्रावर जमिनीची विक्री करण्याचं काम करते. 

लूनार सोसायटी इंटरनॅशनलकडून अनेक सेलिब्रिटींनी जमीन घेतल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीने थेट चंद्रावरच जमीन दिल्याने तरुणाची जोरदार चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या नोएडात असलेल्या इफ्तेखारचं मूळ गाव बिहार राज्याच्या दरभंगा जिल्ह्यातील आहे. तो नोएडामध्ये एआर स्टुडिओज या नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी चालवतो. तसेच लूनार सोसायटी इंटरनॅशनल (Lunar Society International) या अमेरिकन कंपनीसाठीही काम करतो. ही कंपनी चंद्रावरच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचं काम करते. त्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये इफ्तेखारने काही सुधारणा केल्या आणि ते अपडेट केलं. त्यामुळे कंपनीला बराच फायदा झाला. म्हणूनच कंपनीने त्याला चंद्रावरची एक एकर जमीन चक्क गिफ्ट म्हणून देऊन टाकली.

इफ्तेखार रहमानी याच्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना याचा खूप मोठा आनंद झाला आहे. इफ्तेखारची आई नासरा बेगम यांनी आपल्या मुलाने मिळवलेल्या या यशाबद्दल आपण अतिशय खूश असल्याचं त्यांनी सांगितलं. 'माझा मुलगा जगभर नाव कमावतोय अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सूरतमध्ये एका हौशी व्यक्तीने थेट चंद्रावरच (Moon) जमीन विकत घेतली आहे. एका व्यापाऱ्याने आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. विजयभाई कथीरिया असं जमीन विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याचं नाव आहे. 

हौसेला मोल नाही! 2 महिन्यांच्या लेकासाठी 'त्याने' थेट चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

कथीरिया यांनी आपल्या दोन महिन्याच्या मुलाचं नाव नित्या ठेवलं असून नुकतंच त्यांनी त्याच्यासाठी थेट चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्रीमध्ये एक मेल पाठवला होता. यावर त्यांना 13 मार्चला अप्रूवल मिळालं. यानंतर त्यांनी आपले सर्व गरजेचे कागदपत्रही तिथे पाठवले. त्यांच्या कुटुंबाला मुलाच्या नावाच्या कंपनीचं एक प्रमाणपत्रही मिळालं आहे. त्यांना चंद्राच्या दुसर्‍या बाजूला जमीन दिली गेली आहे. त्या ठिकाणचे नाव मेर मॉस्कोव्हियन्स आहे. सी ऑफ मस्कॉवी असं देखील म्हणतात. जमीन खरेदीच्या किंमतीचा अहवालात खुलासा केला गेलेला नाही. मात्र याची किंमत 750 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 54 हजार रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: Lunar Society International iftekhar gifted land moon american company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.