कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर ‘सुगंधी’ उतारा शोधण्यासाठी लखनौ दौरा!

By जयंत होवाळ | Updated: February 5, 2026 16:19 IST2026-02-05T16:11:12+5:302026-02-05T16:19:16+5:30

मुंबई: पूर्व उपनगरातील कांजूर डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीवर ‘सुगंधी’ उतारा शोधण्यासाठी आता तज्ज्ञांची समिती लखनौ शहराचा दौरा करणार आहे. मात्र, त्याचबरोबर कांजूर डम्पिंगशिवाय अन्य कोणताही पर्याय मुंबई महापालिका प्रशासनापुढे नाही, हेही स्पष्ट झाले आहे.

Lucknow tour to find a 'fragrant' antidote to the stench of Kanjur dumping! | कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर ‘सुगंधी’ उतारा शोधण्यासाठी लखनौ दौरा!

कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर ‘सुगंधी’ उतारा शोधण्यासाठी लखनौ दौरा!

जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: पूर्व उपनगरातील कांजूर डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीवर ‘सुगंधी’ उतारा शोधण्यासाठी आता तज्ज्ञांची समिती लखनौ शहराचा दौरा करणार आहे. मात्र, त्याचबरोबर कांजूर डम्पिंगशिवाय अन्य कोणताही पर्याय मुंबई महापालिका प्रशासनापुढे नाही, हेही स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कांजूर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न बिकट झाला आहे. डम्पिंगची दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ते हटविण्यासाठी विक्रोळीकर विकास मंच आणि पर्यावरणवादी संस्था नेटाने कायदेशीर लढा देत आहेत. या संदर्भात मध्यंतरी डम्पिंगचे अन्यत्र स्थलांतर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यास प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे वर्ग केले. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या डम्पिंगची पाहणी केली होती. 

सुनावणीमुळे धावपळ 

२४ फेब्रुवारीला न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून, त्यापूर्वी न्यायालयात काहीतरी ठोस पर्याय सादर करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू असल्याचे समजते. 

क्षमता कधी संपणार?

कांजूर डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया केंद्र असल्याने क्षमतेचा अडथळा नाही. या आधी अन्य डम्पिंग ग्राउंडवर कचरा आणून टाकला जायचा; परंतु प्रक्रिया केली जात नव्हती. त्यामुळे वर्षानुवर्षे कचऱ्याचे ढीग साठत असत. परिणामी कालांतराने ते डम्पिंग ग्राउंड बंद करावे लागत असत. परंतु, कांजूर डम्पिंगवर कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने कचऱ्याचे ढीग साठण्याचा प्रश्न येत नाही. दुर्गंधीची समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. एका अर्थाने कांजूर डम्पिंग ग्राउंडला भविष्यातही अन्य पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पर्यायी जागेचा प्रश्न कायम

कांजूर डम्पिंग ग्राउंड अन्य जागी स्थलांतरित करावे, अशी मागणी होत असली तरी पालिकेकडे मुंबई आणि परिसरात अन्य पर्यायी जागा नाही. पर्यायी जागेकरिता पालिकेने अनेक जागांची चाचपणी केली. परंतु, काही ठिकाणी स्थानिकांचा विरोध आणि काही ठिकाणी आवश्यक तेवढ्या जागेची उपलब्धता नसल्याने हा नाद सोडून देण्यात आला. त्यामुळे भविष्यातही पालिकेकडे कांजूर डम्पिंग ग्राउंड शिवाय अन्य पर्याय नाही.

सविस्तर आढावा 

डम्पिंगच्या दुर्गंधीवर उतारा शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती गुरुवारी लखनौला रवाना होत आहे. तेथील डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया, दुर्गंधी रोखण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान याचा आढावा घेतला जाईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  सांगितले. 

Web Title : कांजूर डंपिंग की दुर्गंध का समाधान ढूंढने विशेषज्ञ लखनऊ जाएंगे।

Web Summary : कांजूर डंपिंग ग्राउंड की दुर्गंध का समाधान ढूंढने के लिए विशेषज्ञ लखनऊ जाएंगे। नगर पालिका के पास कोई वैकल्पिक डंपिंग स्थल नहीं है। अदालत में सुनवाई 24 फरवरी को है। वे अपशिष्ट प्रसंस्करण और गंध नियंत्रण तकनीकों का अध्ययन करेंगे।

Web Title : Experts to visit Lucknow for solution to Kanjur dumping odor.

Web Summary : Experts will visit Lucknow to find a solution to the Kanjur dumping ground odor. The municipality lacks alternative dumping sites. The court hearing is on February 24. They will study waste processing and odor control techniques.

टॅग्स :Mumbaiमुंबई