लखनऊचे पोलीस आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह! नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी केली होती टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 23:13 IST2021-12-10T23:13:21+5:302021-12-10T23:13:51+5:30
Lucknow Police Commissioner DK Thakur Corona Positive: कोरोनाच्या पहिल्या टेस्टिंगमध्ये पोलीस आयुक्त डीके ठाकूर पॉझिटिव्ह आढळले आहेत.

लखनऊचे पोलीस आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह! नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी केली होती टेस्ट
लखनऊ : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारतातही ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात आतापर्यंत 32 जणांना ओमायक्रॉन संसर्गाची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तर या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर कोरोना टेस्टिंग सुद्धा वाढण्यात आले आहे. यातच आता उत्तर प्रदेशातील लखनऊच्या पोलीस आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
कोरोनाच्या पहिल्या टेस्टिंगमध्ये पोलीस आयुक्त डीके ठाकूर पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर त्यांचे दुसरे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा रिपोर्ट म्हणजेच शनिवारी येणार आहे. तसेच, पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सुद्धा आता कोरोना टेस्ट केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. खरंतर, पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी प्रोटोकॉल अंतर्गत त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये आयुक्त डीके ठाकूर यांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. सध्या ते त्यांच्या निवासस्थानी असून क्वारंटाईन आहेत.
देशात आतापर्यंत 32 जणांना ओमायक्रॉनची लागण
भारतात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ( Omicron variant) 32 रुग्ण आहेत. या रग्णांपैकी कोणत्याही रुग्णाला गंभीर लक्षणे नाहीत. यासंदर्भातील माहिती सरकारने शुक्रवारी दिली. राजस्थानमध्ये नऊ, गुजरातमध्ये तीन, महाराष्ट्रात 17, कर्नाटकात दोन आणि दिल्लीतील एका व्यक्तीमध्ये या संसर्गाची पुष्टी झाली आहे. याचबरोबर, शनिवारी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांची बैठक (Cabinet secretary Meeting on Omicron) देखील होणार आहे. या बैठकीत देशातील कोरोना विषाणूची ताजी परिस्थिती, आरोग्य सुविधा यावरही विचारमंथन केले जाणार आहे.
59 देशांत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन 53 देशांमध्ये पसरला आहे. 2936 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यूकेमध्ये 817, डेन्मार्कमध्ये 796 आणि दक्षिण आफ्रिकेत 431 मध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर कॅनडामध्ये 78, अमेरिकेत 71, जर्मनीमध्ये 65, दक्षिण कोरियामध्ये 60 जणांना ओमायक्रॉनची लागण झ्लायेच दिसून आले आहेत.