उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील बंथरा पोलीस स्टेशन परिसरात १६ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी जलद कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. तर, तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तातडीने पथके तयार केली. काल रात्री उशिरा हरोनी रेल्वे स्थानकाजवळ पोलीस तपासणी करत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ललित कश्यप याच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचा पिस्तूल, काडतुसे आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. तर ललित कश्यपचा दुसरा साथीदार घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पोलीसांनी सामूहिक बलात्कारात सहभागी असलेल्या तिसऱ्या आरोपीला अटक केली.
डीसीपी दक्षिण निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, "बंथरा पोलिसांना काल संध्याकाळी ५ वाजता सामूहिक बलात्काराची माहिती मिळाली. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, उर्वरित फरार आरोपींना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे."
शनिवारी, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बांथरा परिसरातील अल्पवयीन विद्यार्थिनी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी मित्रासोबत घराबाहेर पडली. त्यावेळी पाच जणांनी तिच्या मित्राला मारहाण केली आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. त्यानंतर मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडिता संध्याकाळी ५ वाजता घरी परतल्यानंतर तिने कुटुंबाला ही माहिती दिली.
विशाल गुप्ता, राजेंद्र कश्यप उर्फ बाबू, मेराज, ललित कश्यप आणि शिव कश्यप अशी आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून, बांथरा पोलिस ठाण्याने तातडीने आयपीसीच्या कलम ३७६(२), ३५४(३) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ५(जी)/६ अंतर्गत गुन्हा (एफआयआर क्रमांक ३५०/२०२५) नोंदवला असून, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Web Summary : A 16-year-old girl was gang-raped in Lucknow. Police arrested two accused after an encounter. The victim was attacked while going to meet her sister. The remaining accused are being sought.
Web Summary : लखनऊ में 16 वर्षीय लड़की से सामूहिक बलात्कार किया गया। पुलिस ने मुठभेड़ के बाद दो आरोपियों को गिरफ्तार किया। पीड़िता अपनी बहन से मिलने जा रही थी तभी उस पर हमला किया गया। शेष आरोपियों की तलाश जारी है।