शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Levana Hotel Fire : लखनऊच्या लेवाना हॉटेलला भीषण आग, दोघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 11:36 IST

Levana Hotel Fire : काहीजण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील लेवाना हॉटेलमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. लेवाना हॉटेल लखनऊच्या हजरतगंज भागात आहे. लेवाना हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या खोल्यांमध्ये अनेक लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, काहीजण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आग लागल्यानंतर लेवाना हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना खिडक्या तोडून बाहेर काढण्यात येत आहे. दरम्यान, लेवाना हॉटेल लखनऊमधील सर्वात उच्चभ्रू भागात असलेल्या हजरतगंजमध्ये आहे. लखनऊ रेल्वे स्टेशनपासून ते फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. याच हॉटेलजवळ हजरतगंज मेट्रो स्टेशन देखील आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, हॉटेलला लागलेली आग खूप भीषण आहे. आगीमुळे काहीजण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हॉटेलमध्ये बरेच लोक आहेत. आपत्कालीन एक्झिट तोडून लोकांना बाहेर काढले जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या असून मदतकार्य सुरु आहे. याशिवाय, लोकांना बाहेर काढण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांच्या काचाही तोडण्यात आल्या आहेत. तसेच, आगीत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. यादरम्यान, हॉटेलला लागलेल्या आगीच्या धुरामुळे गुदमरल्याने अनेक जण बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआग