शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

धक्कादायक! सलाईनमिश्रित रक्त बाटल्यांची होतेय विक्री, रुग्णांच्या जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 20:50 IST

साधारण दोन महिन्यांपूर्वी शहरात होणाऱ्या रक्त बाटल्यांमधील काळ्या बाजाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर, रक्ताच्या बाटल्या विकणाऱ्या अनेक

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजधानी लखनौ येथे नकली रक्ताच्या बाटल्या मिळाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून येथे सलाईनच्या बाटल्यातील खारे पानी वापरुन रक्ताच्या बाटल्या बनिवण्याचा काळा बाजार करण्यात येत होतात. याप्रकरणी एटीएसने 5 जणांना अटक केली आहे. रक्ताच्या बाटल्यांचा काळा बाजार करुन या आरोपींनी रुग्णांच्या जीवाशी खेळ केला आहे. आत्तापर्यंत जवळपास 1 हजारपेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या विकल्या आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणात शहरातील अनेक ब्लड बँक आणि पथॉलजी लॅबमधील कर्मचारी जोडले गेले आहेत. एटीएसने महत्वाचा सुगावा हाती लागल्यानंतर एफएसडीएच्या मदतीने ब्लड बँकांविरुद्ध तपास सुरू केला आहे. 

एसएसपी एटीएफ अभिषेक कुमार सिंह यांनी सांगितले की, साधारण दोन महिन्यांपूर्वी शहरात होणाऱ्या रक्त बाटल्यांमधील काळ्या बाजाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर, रक्ताच्या बाटल्या विकणाऱ्या अनेक नशाबाजांना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी, त्रिवेणीनगर येथील एका फ्लॅटमध्ये रक्ताचा काळा बाजार चालत असल्याचे समजले. त्यानुसार गुरुवारी रात्री याप्रकरणाचा मास्टरमाईंड मोहम्मद नसीमच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा, फ्लॅटमध्ये सलाईनच्या बाटल्यांतून तयार करण्यात रक्ताच्या बाटल्या, रक्ताच्या बॅग, रॅपर आणि अन्य सामाना जप्त करण्यात आले. तर, मोहम्मदसह त्याच्या आणखी 5 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 

ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग

पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. याप्रकरणात निराला बीएनके ब्लड बँकेतील लॅब टेक्निशियन राघवेंद्र प्रताप आणि लॅब असिस्टंट पंकज त्रिपाठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, रिक्षाचालक आणि नेशबाजांना या रक्ताच्या बाटल्या विकण्याचे काम देण्यात आले होते. रक्तदात्यांना 500 ते 1000 रुपये देऊन त्यांच्याकडून हे रक्त खरेदी करण्यात येत होते. त्यानंतर, 2 ते 4 हजार रुपयांत या मिलावटी रक्त बाटल्यांची विक्री होत होती. गरीब आणि गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात फसवून हे रक्त विकले जाई. 

तज्ज्ञांनी वर्तवला धोका

याप्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर एसटीएफने अनेक तज्ज्ञांशी संपर्क साधला. तज्ज्ञांच्या मतानुसार, या रक्ताच्या बाटल्यात सलाईनचे पाणी मिळसल्याने आरबीसी ब्रोकेने (हिमोलाईज्ड) होते. त्यामुळे रुग्णाले या बाटलीतील रक्त चढवल्यानंतर रुग्णाला ह्रदयविकाचा झटका येऊ शकतो. विशेष म्हणजे, कुठल्याही तपासणीशिवाय रक्त चढवल्यास, एचआयव्ही आणि कावीळ यासारख्या जीवघेणे रोगही उद्भवू शकतात, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.    

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी