नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:36 IST2025-06-15T16:35:18+5:302025-06-15T16:36:00+5:30
केदारनाथजवळील गौरकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले, यामध्ये पायलटसह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
उत्तराखंडमध्ये रविवारी पहाटे एक दुःखद अपघात झाला. येथे केदारनाथजवळील गौरकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील एक जोडपे आणि त्यांची २ वर्षांच्या मुलीचाही समावेश होती. यामध्ये त्यांचा मुलगा बचावला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जोडप्याची आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीची ओळख राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि काशी राजकुमार जयस्वाल अशी झाली आहे.
या जोडप्याला विवान नावाचा एक मुलगाही असल्याचे सांगण्यात येत आहे. तो त्यांच्या पालकांसोबत केदारनाथला गेला नाही, तो पांढरकवडा येथे त्याच्या आजोबांसोबत राहिला. यामुळे तो वाचला. घटनेच्या वेळी हेलिकॉप्टर उडवणारा पायलट राजवीर सिंग चौहान देखील या अपघाताचा बळी ठरला. तो दोन महिन्यांपूर्वीच जुळ्या मुलांचा बाप झाला होता.
केदारनाथ धाम ते गुप्तकाशी या उड्डाणादरम्यान आज सकाळी बेल ४०७ हेलिकॉप्टरच्या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी आर्यन एव्हिएशनच्या मालकीचे बेल ४०७ हेलिकॉप्टर व्हीटी-बीकेए श्री केदारनाथजी ते गुप्तकाशी येथील आर्यन हेलिपॅडला ऑपरेशनल फ्लाइटवर होते तेव्हा हेलिकॉप्टरला अपघात झाला.
यामध्ये पाच प्रवासी, एक बाळ आणि एक क्रू मेंबर होते. हेलिकॉप्टरने गुप्तकाशीहून सकाळी ०५:१० वाजता उड्डाण केले आणि श्री केदारनाथजी हेलिपॅडवर ०५:१८ वाजता उतरले. हेलिकॉप्टर पुन्हा पहाटे ०५:१९ वाजता गुप्तकाशीसाठी उड्डाण केले आणि गौरीकुंडजवळ कोसळले.
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
खबरदारीचा उपाय म्हणून, डीजीसीएने चार धाम येथे हेलिकॉप्टर ऑपरेशन्सची वारंवारता आधीच कमी केली आहे. अधिक देखरेख ठेवत आहे आणि पुढील कारवाईसाठी ऑपरेशनचा आढावा घेत आहे. या अपघाताची चौकशी एएआयबीकडून केली जाईल.