शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अग्निकल्लोळ! LPG ट्रकचा यू-टर्न, मागून दुसऱ्याने दिली धडक; ८ जणांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:42 IST

जयपूरमधील भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. एलपीजी ट्रक यू-टर्न घेत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याच दरम्यान मागून एक ट्रक येतो, जो एलपीजी ट्रकला जोरदार धडकतो.

जयपूरमधील भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. एलपीजी ट्रक यू-टर्न घेत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याच दरम्यान मागून एक ट्रक येतो, जो एलपीजी ट्रकला जोरदार धडकतो. धडकेमुळे एलपीजी ट्रकचं नोजल तुटतं आणि गॅस गळती सुरू होते. गॅस गळती झाल्यानंतर काही सेकंदात मोठा स्फोट होतो आणि सर्वत्र आग दिसते.

राजस्थानच्या जयपूरमध्ये आज (२० डिसेंबर) सकाळी ६ वाजता एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका ट्रकची दुसऱ्या एलपीजी ट्रकला धडक बसली. या धडकेनंतर एलपीजी ट्रकला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर जवळपास उभ्या असलेल्या ४० वाहनांनाही आग लागली. आग एवढी भीषण होती की ५ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आतापर्यंत ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ३५ हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक लोक असे आहेत ज्यांचं शरीर अपघातात ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजलं आहे.  गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर जयपूरमधील सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातfireआग