दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता 'गॅस'वर, महिन्याला वाढणार सिलिंडरची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 08:58 PM2017-07-31T20:58:04+5:302017-07-31T21:03:24+5:30

केंद्र सरकारने अनुदानित घरगुती गॅसच्या (एलपीजी) किंमतीत वाढ करण्याचे आदेश सरकारी तेल कंपन्यांना दिले आहेत.

LPG prices to be hiked by Rs 4 per month | दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता 'गॅस'वर, महिन्याला वाढणार सिलिंडरची किंमत

दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता 'गॅस'वर, महिन्याला वाढणार सिलिंडरची किंमत

googlenewsNext
ठळक मुद्देमार्च 2017 पर्यंत स्वयंपाकाच्या सिलिंडरवरील अनुदान संपवण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सबसिडी पूर्णपणे बंद होणार आहे.सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना 1 जुलै 2016 पासून प्रति महिना सबसिडी असलेले एलपीजी सिलेंडरची किंमत 2 रुपयांनी वाढविण्यासाठी अधिकार देण्यात आले होते.

नवी दिल्ली, दि. 31 - केंद्र सरकारने अनुदानित गॅसच्या (एलपीजी) किंमतीत वाढ करण्याचे आदेश सरकारी तेल कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे अनुदानित गॅसच्या किंमती प्रत्येक महिन्याला चार रुपयांनी वाढणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती लोकसभेत एक प्रश्नाला उत्तर देतांना दिली आहे. पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत स्वयंपाकाच्या सिलिंडरवरील अनुदान संपवण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठीच घरगुती वापराच्या सिलिंडरवरील अनुदान हळूहळू संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे त्यांनी लोकसभेत सांगितले.
लोकसभेत बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत सबसिडी पूर्णपणे संपवण्यासाठी प्रत्येक महिन्यात अनुदानीत एलपीजी सिलेंडरवर (14.5 किलोग्राम) दरमहा 4 रुपये वाढवण्यासाठी सांगण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात 12 सिलेंडर सब्सिडीसह मिळतात. त्यानंतर सिलेंडरवर सबसिडी मिळत नाही. सरकारने यापूर्वी इंडियन ऑइल,  भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या सबसिडीवाल्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याला प्रति सिलेंडर 2 रुपयांनी वाढवण्यास सांगितले होते. आता सरकारने याची किंमत दुप्पट वाढवली आहे. त्यामुळे सबसिडी पूर्णपणे बंद होणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेच्या आडचणीत वाढ झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने आता 1 जून 2017 पासून प्रत्येक महिन्याला प्रति सिलेंडर 4 रुपये वाढवण्यास सांगितले आहे. ही वाढ सबसिडी संपेपर्यंत सुरु राहिल. १८ मार्च 2018 ला सबसिडी पूर्णपणे बंद होईल.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना 1 जुलै 2016 पासून प्रति महिना सबसिडी असलेले एलपीजी सिलेंडरची किंमत 2 रुपयांनी वाढविण्यासाठी अधिकार देण्यात आले होते. तेव्हापासून तेल कंपन्यांनी 10 वेळा एलपीजी सिलेंडरची किंमत वाढवली आहे. एक जुलैला एलपीजी सिलेंडरची किंमत 32 रुपयांनी वाढली. गेल्या सहा वर्षात ही सर्वात जास्त वाढ आहे. सब्सिडी असलेले एलपीजी सिलेंडरचे दिल्लीमध्ये सध्याचे दर 477.46 रुपये आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याची किंमत 419 .18 रुपये होती. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 564 रुपये आहे.

Web Title: LPG prices to be hiked by Rs 4 per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.