LPG Cylinder Booking: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी सरकार आणि तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. भारत पेट्रोलिय कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने सिलेंडर बुकिंगसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हे नियम LPG वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहेत.
महिन्याला जास्तीत जास्त किती सिलेंडर?
नवीन नियमांनुसार, एक सामान्य ग्राहक एका महिन्यात जास्तीत जास्त दोन LPG सिलेंडरच बुक करू शकतो. जर एखाद्या ग्राहकाने यापेक्षा जास्त सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला, तर सिस्टम बुकिंग ब्लॉक करू शकते किंवा अतिरिक्त पडताळणी प्रक्रिया सुरू होऊ शकते.
सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात (1 एप्रिल ते 31 मार्च) 12 अनुदानित सिलेंडर देते. याशिवाय गरज असल्यास ग्राहक आणखी 3 नॉन-सबसिडी सिलेंडर खरेदी करू शकतो. म्हणजेच एका कनेक्शनवर वर्षभरात जास्तीत जास्त 15 सिलेंडर बुक करता येतील.
दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी आता 25 दिवसांची अट
पूर्वी दुसरा सिलेंडर पहिल्या सिलेंडरनंतर 21 दिवसांनी बुक करता येत होता. आता ही मर्यादा वाढवून 25 दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आधीपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागेल.
अतिरिक्त सिलेंडरसाठी नवीन प्रक्रिया
जर ग्राहकाने वार्षिक 12 सिलेंडरचा कोटा पूर्ण केला असेल आणि अतिरिक्त सिलेंडर हवा असेल, तर त्यासाठी नवीन पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना Hello BPCL मोबाईल अॅपचा वापर करावा लागेल.
या अॅपमध्ये काही प्रश्न विचारले जातील, जसे की घरी लग्न किंवा मोठा कार्यक्रम आहे का? पाहुण्यांची अंदाजे संख्या किती आहे? या माहितीच्या आधारे अतिरिक्त सिलेंडर मंजूर केला जाईल की नाही, हे ठरवले जाईल.
OTP शिवाय सिलेंडर मिळणार नाही
आता सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP (DAC) येईल. हा OTP डिलिव्हरी बॉयला सांगितल्यानंतरच सिलेंडर मिळेल.
e-KYC अनिवार्य
सरकारने सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य केले आहे. ज्यांचे KYC अपडेट नाही, त्यांची सबसिडी थांबवली जाऊ शकते किंवा सिलेंडर बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच सिलेंडर बुकिंग फक्त नोंदणीकृत मोबाईल नंबरवरूनच करता येईल. मोबाईल नंबर बदलल्यास एजन्सी किंवा अॅपद्वारे अपडेट करणे आवश्यक आहे.
Web Summary : New LPG rules limit monthly bookings to two cylinders. Aadhar e-KYC, OTP verification, and a 25-day gap between bookings are mandatory. Yearly, 12 subsidized plus 3 non-subsidized cylinders are allowed. Additional cylinders require justification via the Hello BPCL app.
Web Summary : नए एलपीजी नियमों के अनुसार, महीने में केवल दो सिलेंडर बुक किए जा सकते हैं। आधार ई-केवाईसी, ओटीपी सत्यापन और बुकिंग के बीच 25 दिनों का अंतर अनिवार्य है। सालाना, 12 सब्सिडी वाले और 3 गैर-सब्सिडी वाले सिलेंडर अनुमत हैं। अतिरिक्त सिलेंडरों के लिए हेलो बीपीसीएल ऐप के माध्यम से औचित्य आवश्यक है।