कौतुकास्पद! भारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ, जगासमोर आदर्श

By मोरेश्वर येरम | Published: January 20, 2021 03:20 PM2021-01-20T15:20:39+5:302021-01-20T15:21:45+5:30

गेल्या सात दिवसांमध्ये प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमागे दैनंदिन पातळीवर वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये इतर देशांशी तुलना करता भारतात सर्वात कमी रुग्णांची वाढ

the lowest daily corona outbreak in India ideal for the world | कौतुकास्पद! भारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ, जगासमोर आदर्श

कौतुकास्पद! भारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ, जगासमोर आदर्श

Next
ठळक मुद्देकोरोना रुग्णसंख्येत भारतात सातत्याने घटसंपूर्ण जगात होतंय भारताचं कौतुकदैनंदिन पातळीवर वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट

कोरोनाच्या उद्रेकाबाबत भारताने आता जगासमोर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारतात आज २४ गेल्या तासांमध्ये दोन लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली असून गेल्या २०७ दिवसांमध्ये आजचा सर्वात कमी कोरोना रुग्णवाढीचा आकडा नोंदविला गेला आहे. 

विशेष म्हणजे, गेल्या सात दिवसांमध्ये प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमागे दैनंदिन पातळीवर वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये इतर देशांशी तुलना करता भारतात सर्वात कमी रुग्णांची वाढ होत आहे. भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता पाहता देशासाठी ही अतिशय चांगली बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती जाहीर केली आहे.

देशात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत देशात ६,७४,८३५ लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात पहिल्या टप्प्यात एकूण ३ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला देशात वापरासाठी तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची घटची संख्या सर्वांना सुखावणारी असून भारताकडून इतर शेजारी देशांनाही लशीचा पुरवठा केला जात असल्याबाबत जगात भारताचं कौतुक केलं जात आहे. 

Read in English

Web Title: the lowest daily corona outbreak in India ideal for the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.