घटनात्मक संस्थांच्या बैठकांचे कमी प्रमाण चिंताजनक - ओम बिर्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 06:33 IST2025-01-21T06:32:43+5:302025-01-21T06:33:48+5:30
Om Birla News: देशात लाेकसभा, विधानसभांसारख्या घटनात्मक संस्थांच्या बैठकांचे प्रमाण कमी हाेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी केले.

घटनात्मक संस्थांच्या बैठकांचे कमी प्रमाण चिंताजनक - ओम बिर्ला
पाटणा - देशात लाेकसभा, विधानसभांसारख्या घटनात्मक संस्थांच्या बैठकांचे प्रमाण कमी हाेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी केले. येथे आयोजित ८५व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. दिल्ली विधानसभेचे पाच वर्षांच्या कार्यकाळात केवळ ७४ दिवस कामकाज झाल्यासंबंधी प्रसिद्ध बातमीच्या अनुषंगाने बिर्ला बोलत होते.
‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह’च्या एका अभ्यासानुसार विसर्जित झालेल्या दिल्ली विधानसभेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केवळ ७४ दिवस बैठका झाल्या. म्हणजेच वर्षात सरासरी १५ दिवसच कामकाज झाले. या पार्श्वभूमीवर बिर्ला यांनी या सभागृहांची प्रतिष्ठा जपण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, असे आवाहन केले. (वृत्तसंस्था)
दोन दिवसीय संमेलन
या दोन दिवसीय संमेलनात ‘राज्यघटनेची ७५ वर्षे आणि घटनात्मक मूल्यांच्या जपणुकीसाठी संसदेसह राज्य विधानसभांचे योगदान’ या विषयावर चर्चा होत आहे. या संमेलनाच्या समारोपात बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे मार्गदर्शन करतील.