कमी दाबाने पाणी पुरवठा
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:59+5:302015-03-08T00:30:59+5:30
प्रभागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे. घंटागाडी नियमित येते. रस्त्यांवरील दिवे चालू असून, काही वेळा बंद असतात. औषध फवारणी होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत आहे, परंतु कधी कधी कमी दाबाने पाणी येते.

कमी दाबाने पाणी पुरवठा
प रभागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे. घंटागाडी नियमित येते. रस्त्यांवरील दिवे चालू असून, काही वेळा बंद असतात. औषध फवारणी होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत आहे, परंतु कधी कधी कमी दाबाने पाणी येते.- दिस्ती जोशी, जुने सिडको.रस्त्यावरील भाजीबाजार हटवाप्रभागातील पाणीप्रश्न व इतर समस्या या भेडसावत नसल्यातरी जुने सिडको येथे रस्त्यावर भरणारा भाजीबाजार हटविणे गरजेचे आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच वाहतुकीची समस्या सुटेल. - सुरज अहिरे, शांतीनगरगुन्हेगारी थांबवा प्रभागातील पाणीप्रश्न सुरळीत आहे. रस्त्यांवरील दिवेदेखील रात्रीच्या वेळी सुरू असतात. परंतु प्रभागात चोरी होण्याचे व गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. - तानाजी सांगळे, लेखानगर पोलीस गस्त वाढवावीप्रभागात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणे मुश्कील झाले असून, यासाठी पोलिसांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची गरज आहे.- जयश्री लोखंडे, जुने सिडको.धूर फवारणी करावीप्रभागात औषध व धूर फवारणी केली जात नाही. सिडको भागात स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या वाढली असून, मनपाने स्वच्छता व धूर फवारणी नियमित करावी. पथदीप चालू-बंद असतात. हद्दीच्या वादामुळे विकासकामे करताना अडचणी निर्माण होतात. -पंडित सोनवणे, महाराणाप्रताप चौक.डासांचे प्रमाण वाढलेप्रभागात घंटागाडी नियमित येत असली तरी धूर व औषध फवारणी होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. रस्ते चांगले असून, सुंदरबन कॉलनी उद्यानात खेळणी बसविण्याची गरज आहे. - महेंद्र विभांडिक, सुंदरबन कॉलनी(पान ५ वरील उर्वरित मजकूर)उद्यानाची दुरवस्था प्रभागातील सुंदरबन कॉलनी येथे नगरसेवकांनी मनपाच्या माध्यमातून अद्यावत उद्यान उभारले होते. या उद्यानात दररोज सायंकाळच्या वेळी खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होत असे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे टवाळखोरीचा उपद्रव वाढलेला आहे. याठिकाणी असलेल्या खेळण्या गायब झाल्या असून, उद्यानातील लॉन खराब झाले आहे. उद्यानातील दिवे बंद झालेले असून, संपूर्ण उद्यानाची दुरवस्था झाली आहे. प्रभागात उद्यानांची संख्या कमी असतानाही आहे त्या उद्यानाची देखभाल मनपाकडून करण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.