प्रियक्षा गावडेचे क्रिडा स्पर्धेत धवल यश

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:02+5:302014-12-23T00:04:02+5:30

साखळी : चोडण येथील रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी प्रियक्षा गावडे यांनी गोवा राज्य क्रिडा संचालनालय आणि युवा व्यवहारतर्फे घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेतील धावण्याच्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. तिने तालुका पातळीवरील ८०० मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक, ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक तर २०० मी. धावण्याच्या द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हा पातळीवर ८०० मी. धावण्याच्या शर्यतीत पुन्हा प्रथम क्रमांक, ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक तर २०० मी. धावण्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. राज्य पातळीवर ८०० मी. धावण्यात प्रथम, ४०० मी. धावण्यात प्रथम तर २०० मी. धावण्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला.

Lovely success in the Priyo Gaga sports competition | प्रियक्षा गावडेचे क्रिडा स्पर्धेत धवल यश

प्रियक्षा गावडेचे क्रिडा स्पर्धेत धवल यश

खळी : चोडण येथील रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी प्रियक्षा गावडे यांनी गोवा राज्य क्रिडा संचालनालय आणि युवा व्यवहारतर्फे घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेतील धावण्याच्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. तिने तालुका पातळीवरील ८०० मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक, ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक तर २०० मी. धावण्याच्या द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हा पातळीवर ८०० मी. धावण्याच्या शर्यतीत पुन्हा प्रथम क्रमांक, ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक तर २०० मी. धावण्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. राज्य पातळीवर ८०० मी. धावण्यात प्रथम, ४०० मी. धावण्यात प्रथम तर २०० मी. धावण्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्रियक्षा गावडे ही चोडण शैक्षणिक संस्थेच्या दयानंद हायस्कूलमध्ये पूर्वी शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीने चोडण शैक्षणिक संस्थेतर्फे चालविण्यात येणार्‍या रघुवीर आणि प्रेमावती उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेऊन ती आता १२ वी कला शाखेत शिकत आहे. तिला उच्च माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक जगन्नाथ घाटवळ यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्याच निरीक्षणाखाली ती धावण्याचा सराव करीत आहे

Web Title: Lovely success in the Priyo Gaga sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.