Love: “करिश्मा मेरी है, बारात लेकर मत आना...” प्रियकराच्या व्हायरल पत्राची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 07:21 IST2023-02-01T07:21:14+5:302023-02-01T07:21:49+5:30
Love: ‘कान खोलकर सुन दुल्हे राजा... करिश्मा मेरी है, बारात लेकर मत आना...’ हा चित्रपटातील डायलॉग नसून उत्तर प्रदेशमधील एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका माथेफिरू प्रियकराने तरुणीच्या भावी नवऱ्याच्या घराबाहेर हे धमकीचे पोस्टर लावले.

Love: “करिश्मा मेरी है, बारात लेकर मत आना...” प्रियकराच्या व्हायरल पत्राची चर्चा
लखनौ : ‘कान खोलकर सुन दुल्हे राजा... करिश्मा मेरी है, बारात लेकर मत आना...’ हा चित्रपटातील डायलॉग नसून उत्तर प्रदेशमधील
एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका माथेफिरू प्रियकराने तरुणीच्या भावी नवऱ्याच्या घराबाहेर हे धमकीचे पोस्टर लावले. हापूर जिल्ह्यातील फरीदपूर गावातील ही घटना आहे.
“कान उघडे ठेवून ऐक नवरदेव मोन्टू सिंह, करिष्मा माझी आहे. वरात घेऊन येऊ नकोस, नाहीतर जिवंत राहणार नाहीस. वरातीचं रूपांतर स्मशानात करेन. ज्यांना गोळ्या खायच्या असतील त्यांनीच या वरातीत यावे, हा फक्त ट्रेलर आहे, वरातीत अख्खा चित्रपट दाखवेन”, असे या पत्रात लिहिले आहे. हे पत्र व्हायरल झाले आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून, लग्नात सुरक्षा देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.