4 मुलांची आई प्रियकरासह फरार; हतबल पती मारतोय पोलीस ठाण्यात चकरा, सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 17:57 IST2023-07-30T17:57:10+5:302023-07-30T17:57:43+5:30

पती कामासाठी गेला असता याच दरम्यान गावातील दीनानाथ मांझीसोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू झाले.

love affair was going on with the youth of the village in sheikhpura the victim pleaded | 4 मुलांची आई प्रियकरासह फरार; हतबल पती मारतोय पोलीस ठाण्यात चकरा, सांगितली व्यथा

4 मुलांची आई प्रियकरासह फरार; हतबल पती मारतोय पोलीस ठाण्यात चकरा, सांगितली व्यथा

बिहारमध्ये 4 मुलांची आई प्रियकरासह पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय चौधरीचा विवाह 15 वर्षांपूर्वी जवळच्या नालंदा जिल्ह्यातील बिंद पोलीस स्टेशन हद्दीतील जाखौर गावात राहणाऱ्या पिंकी कुमारीसोबत झाला होता. दोन वर्षांत पती संजय चौधरी हा गुजरातच्या अहमदाबादच्या कंपनीत खासगी मजुरी करण्यासाठी गेला

पती कामासाठी गेला असता याच दरम्यान गावातील दीनानाथ मांझीसोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू झाले. तसेच, तो काही महिन्यांपूर्वी पत्नीसह पळून गेला होता. याबाबत पीडित संजय चौधरी यांनी पोलीस ठाणे व न्यायालयाचा धाव घेतल्याचं सांगितले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

अद्यापपर्यंत या प्रकरणात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पत्नी सतत पतीला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे असं पती म्हणाला. पीडितेचा पती संजय चौधरी यांनी सांगितले की, गावातील दीनानाथ मांझी हा माझ्या पत्नीला फूस लावून पळून गेला. पतीने जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

फेसबुकवर सूत जुळलं, लग्न करण्यासाठी 'ती' थेट श्रीलंकेहून आली भारतात    

सीमा हैदरपासून अंजूपर्यंत आणि पोलंडपासून झारखंडपर्यंतच्या बरबरापर्यंत सर्वांनीच प्रेमासाठी देशाच्या 'सीमा' ओलांडल्या आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. शिवकुमारी विघ्नेश्वरी ही 25 वर्षीय श्रीलंकन ​​महिला तिचा फेसबुक फ्रेंड लक्ष्मणसोबत लग्न करण्यासाठी भारतात आली. TOI नुसार, महिलेने आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी लक्ष्मणशी लग्न केले आहे. ही महिला टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. शनिवारी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची बातमी व्हायरल होताच पोलिसांनी तिला 15 ऑगस्टला व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी देश सोडण्याचे किंवा एक्सटेन्शनचे निर्देश दिले आहेत. 
 

Web Title: love affair was going on with the youth of the village in sheikhpura the victim pleaded

टॅग्स :Biharबिहार