शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळच्या पंतप्रधानांचं भगवान श्रीरामांवरील वक्तव्य; अयोध्येतील संत समाज भडकला, धर्मादेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 11:23 IST

ओली म्हणाले, आपण लोक आजपर्यंत याच भ्रमात आहोत, की सीतेचा विवाह ज्या रामाबरोबर झाला, ते भारतीय आहेत. ते भारतीय नाहीत तर नेपाळचे आहेत. जनकपूरपासून पश्चिमेकडे बीरगंजजवळ ठोरी नावाचे ठिकाण आहे. तेथे एक वाल्मिकी आश्रम आहे. राजकुमार राम हे तेथीलच होते.

ठळक मुद्देकेपी शर्मा ओली यांनी भगवान श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याने अयोध्येतील संत समाज भडकलारामदास महाराज म्हणाले, नेपाळमध्ये माझे लाखो शिष्य आहेत आणि उद्यापासून ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरूण निदर्शने करतील. धर्मगुरू महंत परमहंस म्हणाले, केपी शर्मा स्वतःच नेपाळचे नाहीत.

लखनौ - नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भगवान श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याने अयोध्येतील संत समाज भडकला आहे. आता नेपाळमधील आपले शिष्य ओली यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असे राम दल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास महाराज यांनी म्हटले आहे. तसेच वेद आणि पुराणांतील वर्णनाचा उल्लेख करत नेपाळमध्ये शरयू नदी वाहत नाही, असेही रामदास महाराज म्हणाले.

रामदास महाराज म्हणाले, नेपाळमध्ये माझे लाखो शिष्य आहेत आणि उद्यापासून ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरूण निदर्शने करतील. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना एका महिन्याच्या आत खुर्ची सोडावी लागेल. हा धर्मादेश मी जारी करत आहे. माझ्या शिष्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने करावीत आणि ओलींना सत्तेवरून खाली खेचावे.

संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी अयोध्या आहे. वेद, रामायण अथवा पुराणात पाहा, त्यात स्पष्टपणे लिहिले आहे, जेथे शरयू आहे, तेथेच अयोध्या आहे. नेपाळमध्ये तर शरयू नाहीच. संपूर्ण भू-मंडळावर राजे असायचे आणि सर्वांचे चक्रवर्ती सम्राट भारताच्या उत्तर प्रदेशातील अयोध्येचे महाराज असायचे, असेही राम दल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास महाराज म्हणाले.

धर्मगुरू महंत परमहंस म्हणाले, केपी शर्मा स्वतःच नेपाळचे नाहीत. ते संपूर्ण नेपाळला पाकिस्तानप्रमाणे भिकारी बनवायच्या मार्गावर आहेत. नेपाळी जनतेच्या डोळ्यात ते धूळफेक करत आहेत. चीनने नेपाळमधील 2 डझनवर गावांवर कब्जा केला आहे. ते लपवण्यासाठी प्रभू रामाच्या नावाचा ते आश्रय घेत आहेत.

काय म्हणाले होते ओली -ओली म्हणाले, आपण लोक आजपर्यंत याच भ्रमात आहोत, की सीतेचा विवाह ज्या रामाबरोबर झाला, ते भारतीय आहेत. ते भारतीय नाहीत तर नेपाळचे आहेत. जनकपूरपासून पश्चिमेकडे बीरगंजजवळ ठोरी नावाचे ठिकाण आहे. तेथे एक वाल्मिकी आश्रम आहे. राजकुमार राम हे तेथीलच होते. वाल्मिकी नगर नामक ठिकाण आता बिहारच्या पश्चिमेला चम्पारण जिल्ह्यात आहे. ज्याचा काही भाग नेपाळमध्येही आहे. ते वाल्मिकी रामायणाचा नेपाळी भाषेत अनुवाद करनारे नेपाळचे आदिकवी भानुभक्त आचार्य जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

टॅग्स :Ayodhyaअयोध्याNepalनेपाळIndiaभारतTempleमंदिर