शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या विलंबाचा प्रभू स्वत: आढावा घेणार

By admin | Updated: December 10, 2014 01:49 IST

यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी या प्रकल्पाचा स्वत: आढावा घेणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खा. विजय दर्डा यांना दिली आहे.

अधिका:यांना सूचना : खा. दर्डा यांना दिली माहिती
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी या प्रकल्पाचा स्वत: आढावा घेणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खा. विजय दर्डा यांना दिली आहे.
गेल्या महिन्याभरात खा. दर्डा यांनी सुरेश प्रभू यांच्यासोबत झालेल्या काही भेटींमध्ये रेल्वे उद्यान तसेच यवतमाळ- वर्धा- नांदेड रेल्वेमार्गाच्या विस्ताराबाबत अनेकदा चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिका:यांना यापूर्वीच दिल्या आहेत. याबाबत आदेश देण्यात आल्यानंतर खा. दर्डा यांनी यांत्रिकी सदस्य व्ही. के. गुप्ता तसेच कार्यकारी संचालक (वर्क्‍स) प्रकाश डुडेजा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. प्रकल्पाला विलंब होण्याचे कारण काय? त्यातून बाहेर कसे पडायचे यावर ही चर्चा केंद्रित होती. 
 
सातत्याने पाठपुरावा : खा. दर्डा यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि मागणी रेटून धरल्याचे पाहता प्रभू यांनी या प्रकल्पाला गती देण्यासंबंधी मार्ग शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधला जात असून या प्रकल्पाशी निगडित कोणत्या कामांमध्ये राज्य सरकार भागीदारी सुनिश्चित करणार हे जाणून घेतले जात आहे. खा. दर्डा यांनी किमान एक दशकापासून हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी संघर्ष चालविला आहे. या 27क् कि.मी. लांब रेल्वेमार्गामुळे केवळ विदर्भातील अतिमागास भागाचीच नव्हे तर यात्रस्थळ असलेले नांदेड, ज्यांच्या कार्याची जगभरात ओळख आहे असे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धेची वेगळी ओळख निर्माण होईल. तेथील जनतेमधील दळणवळण अधिक सुलभ होईल.