शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

बिहार, दिल्ली आणि अमेरिकेतील निवडणुकांकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 03:13 IST

नव्या वर्षात दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

- समीर परांजपेनुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा दणदणीत पराभव झाला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र यांच्यापाठोपाठ भाजपने झारखंडही गमावले. या निकालांतून देशात सत्ताधारी भाजपविरोधात वातावरण असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत नव्या वर्षात दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मागील निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पक्षाने भाजपचा जोरदार पराभव केला होता. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री बनले होते. बिहारमध्येही मागील खेपेस जनता दल युनायटेड, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने सत्ता मिळविली होती, परंतु पुढे महागठबंधन फिस्कटले आणि नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करून आपली सत्ता टिकविली होती, परंतु झारखंडच्या निकालानंतर नितीशकुमार भाजपविरोधात आक्रमकपणे बोलू लागले आहेत. जदयुचे अन्य नेते अधिक जागांसाठी भाजपवर दबाव टाकू लागले आहेत. त्यामुळे बिहारमध्येही भाजपपुढे आव्हानांची मालिका उभी असल्याचे दिसत आहे.भारतात २०२० साली दिल्ली व बिहार मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. नायब राज्यपाल केंद्राच्या इशाऱ्यावरून दिल्ली सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन केले होते. दिल्लीतील जनतेसाठी मोहल्ला दवाखाने, प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी लागू केलेली सम-विषम योजना, ई-गव्हर्नन्सची राबविलेली प्रभावी योजना आप सरकारने राबविल्या. केंद्र सरकारवर अनेक मुद्द्यांवरून नाराज असलेली जनता दिल्लीतील विधानसभा निवडणुकांत आप पक्षाला पुन्हा संधी देते की, भाजपच्या हाती सत्ता सोपविते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बिहारमध्ये येत्या आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होतील. बिहारमध्ये सध्या जनता दल (यू) व भाजपचे आघाडी सरकार अस्तित्वात आहे. झारखंडमध्ये जसा सत्तापालट झाला, तसे बिहारमध्ये घडल्यास देशातील भाजपविरोधी राजकारणाला वेगळे वळण लागू शकते.इस्राएलमध्ये २ मार्च, २०२० रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला किंवा विरोधातील ब्लू-व्हाइट आघाडीने समसमान जागा जिंकल्या. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पुन्हा झालेल्या निवडणुकांत लिकूड व ब्लू-व्हाइट आघाडीने अगदी थोड्या फरकाने जागा जिंकल्या. या दोन्ही बाजू एकत्र येऊन राष्ट्रीय सरकार स्थापन करायला तयार नाहीत. त्यामुळे इस्राएलवर पुन्हा मार्चमध्ये निवडणुका थोपविल्या गेल्या. तैवानमध्ये ११ जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीन किती हस्तक्षेप करतो, याकडे जगाचे लक्ष राहाणार आहे. आफ्रिकेतील गिनिआ देशात जानेवारी, २०१९ रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. ती आता १६ फेब्रुवारीला होत आहे. त्याशिवाय इथिओपिया, सिंगापूरमध्ये मे महिन्यात तर म्यानमार, बुर्किना फासो येथे नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका, दक्षिण कोरियात १५ एप्रिलला विधिमंडळ निवडणुका आहेत.ट्रम्प यांचे काय होणार?अमेरिकेमध्ये २०१६ साली अध्यक्षपदाच्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. मात्र, धसमुसळ्या स्वभाव व कारभारामुळे ते अतिशय वादग्रस्त ठरले. त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रियाही झाली आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबरला होणाºया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा निवडून येऊ शकतील, असेही म्हटले जाते. अमेरिकेच्या मूळ नागरिकांना अग्रक्रम, तसेच दुसºया देशांतील लोक अटकाव असे ट्रम्प यांचे स्वदेशी धोरण आहे. त्यामुळे ट्रम्पवर अनेक देश नाराज आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNitish Kumarनितीश कुमारDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBJPभाजपाAAPआप