लोणार सरोवर विकास, अकरा विषयांवर चर्चा
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:05+5:302015-02-13T00:38:05+5:30
समितीची पहिली बैठक : हायकोर्टात माहिती सादर

लोणार सरोवर विकास, अकरा विषयांवर चर्चा
स ितीची पहिली बैठक : हायकोर्टात माहिती सादरनागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा विकास, देखभाल व समस्या दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या निर्देशान्वये गठित १० सदस्यीय समितीची पहिली बैठक ७ फेब्रुवारी रोजी झाली. बैठकीत घरकुल योजना, सरोवरातील शेती ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना मोबदला देणे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादी ११ विषयांवर चर्चा करण्यात आली.बुलडाणा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये जिल्हा वनाधिकारी, औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिनिधी, मेहकर येथील उपविभागीय अधिकारी, लोणार येथील तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान, ॲड. एन. बी. काळवाघे व याचिकाकर्ते सुधाकर बुगदाने यांचा समावेश आहे. हे प्रकरण बुधवारी सुनावणीसाठी आले असता बैठकीची माहिती देण्यात आली. यामुळे न्यायालयाने दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली. यापूर्वी न्यायालयाने ९ मार्च २०१० रोजी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. यानंतर जुलै-२०११ मध्ये समितीत सुधारणा केली होती. आता ही नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. लोणार सरोवराचा जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळासारखा विकास करण्यासाठी ॲड. कीर्ती निपाणकर, गोविंद खेकारे व सुधाकर बुगदाने यांनी रिट याचिका दाखल केली आहे़