शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 13:49 IST

Loktantra Bachao Rally Live: 'आता देशात इंडिया आघाडीचे सरकार आणण्याची वेळ आली आहे.'

Loktantra Bachao Rally Live: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीने रविवारी (31 मार्च) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'लोकशाही वाचवा' रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत काँग्रेसकडून सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उपस्थित होते. याशिवाय, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, शिवसेना प्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) सुप्रीमो शरद पवार, सपा सुप्रीमो अखिलेश यादव, आरजेडीकडून तेजस्वी यादव, टीएमसी नेते डेरेक ओ ब्रेयन आणि डाव्यांकडून सीताराम येचुरी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

भ्रष्टाचाराने भरलेला पक्ष...शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, आगामी लोकसभेत भाजपचे 400 जागांचा आकडा पार करण्याचे स्वप्न आहे. पण, आता हीच वेळ आहे, एका व्यक्तीचे आणि पक्षाचे सरकार हद्दपार करावे लागेल. हे सरकार आपल्या देशासाठी धोकादायक आहे. आम्ही सर्वजण इथे निवडणूक प्रचारासाठी नाही, तर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आलो आहोत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, अशा लोकांनाच भाजपने पक्षात सामावून घेतले आहे. भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ केले. हा भ्रष्टाचाराने भरलेला पक्ष सरकार कसे चालवू शकतो? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

सुनीता जी-कल्पना जी, काळजी करू नका- उद्धव ठाकरेहा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, आम्ही याच हुकूमशाहीविरुद्ध लढत आहोत. कल्पना जी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या दोन बहिणी हिंमतीने लढत असतील, तर आम्ही सगळे भाऊ मागे कसे राहणार. आपल्याला एक संमिश्र सरकार आणवे लागेल, हे संमिश्र सरकारच देशाला वाचवू शकते. भ्रष्टाचार करणारे लोक भाजपमध्ये आणि ह्यांनी अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना आरोपी करुन तुरुंगात टाकले. 

ठाकरेचें भाजपला आव्हान...या लोकांनी शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ दिले नाही. शेतकऱ्यांना दहशतवादी मानणारे सरकार पुन्हा येऊ देऊ नका. आता देशात इंडिया आघाडीचे सरकार आणण्याची वेळ आली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट आव्हान दिले. ते म्हणाले, भाजपने त्यांच्या पक्षाच्या बॅनवरवर लिहावे, आमचे तीन सहयोगी ED-CBI-Income Tax आहेत. मी भाजपला त्यांच्या बॅनरवर हा मजकूर लिहिण्याचे आव्हान देतो. 'अबकी बार, बीजेपी तडीपार' अशा घोषणादेखील ठाकरेंनी यावेळी दिल्या. 

24 तास मोफत वीज, प्रत्येक गावात शाळा-क्लिनिक.., पत्नीने वाचले अरविंद केजरीवालांचे पत्र

भ्रष्टाचारात बुडालेल्या लोकांची सभा- भाजपभाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इंडिया आघाडीच्या लोकशाही वाचवा रॅलीवोर जोरदार टीका केली. सभा घ्यायला बंदी नाही, पण जमवणारे कोण? जे भ्रष्टाचारात बुडाले आहेत ते...जे जनतेचा पैसा लुटून तुरुंगात गेले आहेत ते...केजरीवाल लालूंच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. असे भ्रष्टाचारी लोक पीएम मोदींच्या प्रामाणिक सरकारविरोधात एकवटले आहेत. पण, या देशातील जनता त्यांचे ऐकणार नाही. 4 जूनला सर्व काही स्पष्ट होईल, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी