'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 02:54 PM2024-03-31T14:54:10+5:302024-03-31T14:55:45+5:30

Loktantra Bachao Rally Live: 'EVM मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया मॅनेज केल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत.'

Loktantra Bachao Rally : INDIA Maharally LIVE: 'attempt of match fixing in elections...' Rahul Gandhi attacks BJP from Ramlila Maidan | 'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

I.N.D.I.A Rally In Delhi Ramlila Maidan: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीने रविवारी (31 मार्च) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'लोकशाही वाचवा' (Loktantra Bachao Rally) रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर निवडणुकीत फिक्सिंग केल्याचा आरोप केला.

मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न
यावेळी राहुल गांधी म्हणतात, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत, तुम्ही मॅच फिक्सिंग बद्दल ऐकले असेलच. अंपायरवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन, कर्णधाराला धमकावून सामना जिंकला जातो, त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणतात. देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचाची निवड केली आणि सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आले. पीएम मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत आहेत.

EVM मॅनेज केले
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप 400 पारचा नारा देत आहे, पण ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया-सोशल मीडिया विकत घेतल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत. यावेळी भाजप 180 चा आकडाही पार करू शकणार नाही. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती ब्लॉक केली, आमच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत. पैसे देऊन सरकार पाडले जात आहे. नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. पीएम मोदी आणि देशातील तीन-चार अब्जाधीश मिळून मॅक्स फिक्स करत आहेत.

संविधान संपवण्यासाठी मॅच फिक्सिंग
गरीब जनतेच्या हातून देशाची राज्यघटना हिसकावून घेण्यासाठी मॅच फिक्सिंग केली जात आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल, त्या दिवशी देश टिकणार नाही. संविधान हा देशातील जनतेचा आवाज आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल त्या दिवशी स्वतंत्र राज्ये होतील, हाच भाजपचा उद्देश आहे. संविधानाशिवाय एजन्सींच्या माध्यमातून धाक दाखवून देश चालवता येईल. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. संविधान गेले तर गरिबांचे आरक्षण आणि पैसा जाणार.

संबंधित बातमी- 24 तास मोफत वीज, प्रत्येक गावात शाळा-क्लिनिक.., पत्नीने वाचले अरविंद केजरीवालांचे पत्र

नोटाबंदी-जीएसटीचा फायदा कोणत्या गरीबााला झाला? सध्या देशात 40 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आहे. त्यांना संविधान नष्ट करयचे आहे, कारण त्यांचा उद्देश जनतेचा पैसा हिसकावणे आहे. जातीय जनगणना, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना एमएसपी हे देशातील सर्वात मोठे प्रश्न आहेत. जनतेने पूर्ण ताकदीनिशी मतदान केले नाही तर मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. ही निवडणूक देश, राज्यघटना आणि गरीब आणि शेतकऱ्यांचे हक्क वाचवणारी आहे, असंही राहुल यावेळी म्हणाले.

संबंधित बातमी- 'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

Web Title: Loktantra Bachao Rally : INDIA Maharally LIVE: 'attempt of match fixing in elections...' Rahul Gandhi attacks BJP from Ramlila Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.