शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात जागावाटपाचं घोडं अडणार? बसपा 40 जागा मागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 14:00 IST

बसपा सर्वाधिक जागा लढवण्यासाठी आग्रही

लखनऊ: कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं एकत्र येत भाजपाला धूळ चारली. यामुळे 2019 मधील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र विरोधकांच्या या एकजुटीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती 40 लढवण्यासाठी आग्रही असल्यानं विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लागू शकतो. कैराना आणि नुरपूरमध्ये विरोधकांनी भाजपाचा पराभव केल्यावर समाजवादी पक्षानं मोठा जल्लोष केला. मात्र या विजयानंतर मायावतींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मायावती यांचं हे मौन अतिशय सूचक मानलं जातं आहे.कैराना आणि नुरपूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवात मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या दलित मतांचा मोठा वाटा होता. मात्र या विजयानंतरही मायावती शांतच आहेत. बसपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावती यांनी बाळगलेलं मौन हे व्यूहनितीचा भाग आहे. बसपाला लोकसभा निवडणुकीत 80 पैकी 40 जागा हव्या आहेत, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. काही दिवसांपूर्वीच मायावती यांनी निकटवर्तीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केला होता, असंही सूत्रांनी सांगितलं. गेल्या आठड्यात मायावतींनी लखनऊमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बसपाला सन्मानजनक जागा मिळाल्या तर ठिक, अन्यथा पक्ष सर्व जागांवर स्वबळावर लढेल, असं मायावतींनी म्हटलं होतं. गोरखपूर, फुलपूर आणि नुरपूरमधील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षानं बसपाच्या सहकार्यानं विजय मिळवला. मात्र तरीही समाजवादी पक्षानं जागावाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. मायावती यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याकडे 'सन्मानजनक जागावाटपा'बद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी 'आम्ही सन्मान देण्यात कायमच पुढे असतो. सन्मान कोण देत नाही, हे तुम्हाला माहित आहे', असं उत्तर अखिलेश यांनी दिलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवkairanaकैराना