शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे, एकनाथ शिंदेंना काय मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 19:33 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटक पक्षांचं महत्त्व वाढलं आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर यामध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. २०२४ च्या निकालात भाजपाला २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. बहुमतापासून भाजपाला ३२ जागांनी दूर आहे. मात्र भाजपा प्रणित एनडीएला बहुमत मिळाल्याने पुन्हा इकदा देशात एनडीए सरकार बनण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु मोदी ३.० सरकारमध्ये भाजपाला मित्रपक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. प्रत्येकी ४ खासदारांमागे एक मंत्रिपद असं हे सूत्र ठरल्याची बातमी पुढे आली आहे. 

नितीश कुमार यांच्या जेडीयूला ३ मंत्रि‍पदे, चिराग पासवान यांना १ कॅबिनेट मंत्रिपद, जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला १ मंत्रिपद, चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला ४ कॅबिनेट मंत्रि‍पदे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद मिळणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ कॅबिनेट मंत्रिपद, अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलला १ मंत्रिपद तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला १ मंत्रिपद आणि पवन कल्याण यांच्या जनसेनेला १ मंत्रिपद देणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपा एनडीए सरकारमध्ये महत्त्वाची ४ खाती स्वत:कडे ठेवणार आहे. 

भाजपा स्वत:कडे गृह, वित्त आणि संरक्षण मंत्रालयासह आणखी एक महत्त्वाचे खाते ठेवणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाची खाती या राज्यांना दिली जाणार आहेत. एनडीएच्या वाटाघाटीत लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, गृह आणि रेल्वे मंत्रालयात या खात्यावरून रस्सीखेच सुरू आहे. मात्र गृह आणि अर्थ खाते भाजपा सोडणार नाही. रेल्वे खाते मित्रपक्षांना दिले जाऊ शकते. नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रालयासाठी आग्रह धरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला रेल्वे मंत्रालय जाते का हे पाहणं गरजेचे आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालात गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपाची पिछेहाट झाल्याचं पाहून एनडीएतील घटक पक्षांच्या मागणीत वाढ झाली आहे. प्रत्येक पक्ष अधिकची मंत्रि‍पदे मागत आहे. एनडीएला २९३ जागांसह बहुमत मिळालं आहे. त्यात भाजपाला २४० जागा, तेलुगु देसम पार्टीला १६ आणि जनता दल यूनाइटेडला १२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे जेडीयू आणि टीडीपी हे किंगमेकर बनले आहेत. 

टॅग्स :National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेNitish Kumarनितीश कुमारlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल