शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगरमधून; भाजपच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून एकही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 04:47 IST

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेच्या अन्य जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित होतील.

सुनील चावके -

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० आणि एनडीएला ४०० पार हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपने आज १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसीतून, गृहमंत्री अमित शाह गांधीनगरहून, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर केलेला नाही.

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा केली. २९ फेब्रुवारी रोजी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ही नावे निश्चित करण्यात आली होती. निवडणूक समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह आदींचा समावेश आहे. भाजपचा भौगोलिक क्षेत्र आणि प्रदेशांमध्ये विस्तार व्हावा आणि रालोआतील घटक पक्षांचीही वाढ व्हावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. इतर राज्यांतील उमेदवारांची नावे यथावकाश जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख केंद्रीय मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव, मनसुख मांडवीय, सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, ज्योतिरादित्य शिंदे, अर्जुनराम मेघवाल, जी. किशन रेड्डी, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, पंकज चौधरी, श्रीपाद नाईक, व्ही. मुरलीधरन, राजीव चंद्रशेखर, गजेंद्रसिंह शेखावत, डॉ. जितेंद्र सिंह आदींचा समावेश आहे.

कृपाशंकर जौनपूरमधून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप केंद्रात तिसऱ्यांदा बहुमताने सरकार स्थापन करेल. भाजप सर्व राज्यांत आपला विस्तार करण्याचा तसेच सत्ताधारी एनडीए आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.- विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप

मीनाक्षी लेखी, प्रज्ञासिंह यांना वगळलेदिल्लीतील ५ उमेदवारांची घोषणा करताना मीनाक्षी लेखी यांच्या जागेवर बांसुरी स्वराज, चांदनी चौक येथून हर्षवर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेलवाल, दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुडी यांच्या जागेवर रामबीर सिंह बिधुडी तर भोपाळ येथे प्रज्ञा सिंह यांच्याजागी आलोक शर्मा यांना उमेदवारी दिली.

३४ केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री२ माजी मुख्यमंत्री५७ ओबीसी उमेदवार४७ पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाचे२८ महिला उमेदवार४७ युवा नेते२७ अनुसूचित जाती१८ अनुसूचित जमाती

राज्यनिहाय उमेदवारउत्तर प्रदेश     ५१मध्य प्रदेश     २४पश्चिम बंगाल    २०गुजरात     १५राजस्थान     १५केरळ     १२तेलंगणा    ९आसाम     ११झारखंड     ११छत्तीसगड     ११दिल्ली     ५जम्मू आणि काश्मीर     २उत्तराखंड     ३अरुणाचल प्रदेश     २गोवा     १त्रिपुरा     १अंदमान-निकोबार     १दमण आणि दीव     १

दुसरी यादी?भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेच्या अन्य जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित होतील. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा