शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’तील बिघाडी भाजपला फायद्याची ठरणार?; जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 08:54 IST

भाजपविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीमध्ये काश्मीरमधील तीन जागांवरून बिघाडी झाली

प्रशांत शिंदे जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात उधमपूर मतदारसंघात १६ लाख मतदारांपैकी ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ३७० कलम हटवल्यानंतर प्रथमच निवडणूक होत आहे. देशात पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात उधमपूरची टक्केवारी चांगली आहे. मात्र, तेथील गतवेळीपेक्षा दोन टक्के कमी आहे. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला जम्मूत तर ७ मे ला अनंतनागमध्ये मतदान होणार आहे.

भाजपविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीमध्ये काश्मीरमधील तीन जागांवरून बिघाडी झाली. फारुख अब्दुला यांनी मेहबुबा मुफ्ती यांना जागा देण्यास नकार दिल्यानंतर मुफ्ती यांनी तिन्हीही जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे काश्मीरमधील श्रीनगर, बारामुला आणि अनंतनाग या जागांवर नॅशनल कॉन्फरन्सला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, तर जम्मू, उधमपूर व लडाखमध्ये काँग्रेसला पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व माकपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लढत जोरदार होणार आहे.

२०१९ मध्ये काय झाले?भाजपची कोणत्याही मोठ्या पक्षाशी आघाडी नाही. २०१९ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सने श्रीनगर, बारामुला आणि अनंतनाग तर जम्मू, उधमपूर व लडाख या तीन जागांवर भाजपने विजय मिळवला होता.

या गोष्टी लक्षवेधी ठरणारअनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने यावेळी या मतदारसंघात उमेदवार दिला नाही. पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्याविरोधात नॅशनल कॉन्फरन्सने मियाँ अल्ताफ अहमद लारवी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या उमर अब्दुल्ला यांनी यावेळी श्रीनगरऐवजी बारामुल्ला मतदारसंघातून अर्ज भरला आहे. तर श्रीनगरमधून शिया धर्मगुरू आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांना उमेदवारी दिली आहे. जम्मू लोकसभा मतदारसंघात जुगलकिशोर शर्मा यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने रमण भल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :jammu and kashmir lok sabha election 2024जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसudhampur-pcउधमपूर