Lokmat Parliamentary Awards LIVE: सुप्रिया सुळे ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला खासदार; लोकमतकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 08:21 PM2019-12-10T20:21:19+5:302019-12-10T21:31:55+5:30

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते खासदारांचा सन्मान

Lokmat Parliamentary Awards live updates best mps honored by lokmat | Lokmat Parliamentary Awards LIVE: सुप्रिया सुळे ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला खासदार; लोकमतकडून सन्मान

Lokmat Parliamentary Awards LIVE: सुप्रिया सुळे ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला खासदार; लोकमतकडून सन्मान

Next

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निवडक आठ खासदारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीनं लोकमत संसदीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. लोकमत संसदीय पुरस्कार २०१९ हा सोहळा दिल्लीतल्या जनपथ येथील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये संपन्न होत आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात.



Live Updates:
- सर्वोत्कृष्ट खासदार (राज्यसभा) पुरस्कार द्रमुकच्या तिरुची शिवा यांना प्रदान

- सौगत रॉय ठरले लोकसभेतील सर्वोत्तम खासदार

- सुप्रिया सुळेंचा सर्वोत्कृष्ट महिला खासदार (लोकसभा) पुरस्कारानं सन्मान

- विप्लव ठाकूर यांचा  सर्वोत्कृष्ट महिला खासदार (राज्यसभा) पुरस्कारानं गौरव

- सर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार (राज्यसभा) पुरस्कार कहकशां परवीन यांना प्रदान

- डॉ. भारती पवार ठरल्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार

- मुलायम सिंह ठरले लोकसभेतील सर्वोत्कृष्ट खासदार; सिंह यांच्या वतीनं समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी स्वीकारला जीवनगौरव पुरस्कार

- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ठरले जीवनगौैरव पुरस्काराचे मानकरी; राज्यसभेतील सर्वोत्तम खासदार म्हणून गौरव

Web Title: Lokmat Parliamentary Awards live updates best mps honored by lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.