शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Lokmat Parliamentary Awards:"नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून भाजपा जिन्नांना पुन्हा जिवंत करतेय"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 4:19 PM

Lokmat Parliamentary Awards 2019 : नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे.

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे. ते लोकमतच्या संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.  राष्ट्राच्या आधारावर आपण नागरिकत्वाचा कायदा बनवत आहोत. मौलाना अब्दुल कलाम आझाद म्हणाले होते की, मी एक हिंदुस्थानी मुसलमान आहे, माझं या राष्ट्राशी 1 हजार वर्षांचं जुनं नातं आहे, याची आठवणही ओवैसी यांनी करून दिली आहे. मुसलमान असल्यानं आमचा त्या विधेयकात समावेश नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  

श्रीलंकेच्या तमीळ, नेपाळमधल्या मधेशी यांचा या विधेयकात समावेश नाही. चीनकडे भारताचा एक तृतीयांश भाग आहे. त्यामुळे या विधेयकात चीनचाही समावेश करा. बांगलादेशालाही तुम्हीच बनवलं. टायगर सिद्दिकी या माणसानं मुक्ती वाहिनी तयार केली. पुढे त्याच मुक्ती वाहिनीनं बांगलादेशाच्या निर्मितीस मदत केली. भारताच्या मुस्लिमांचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मुस्लिमांशी काहीही संबंध नाही. तुम्ही जिनांचे विचार पुन्हा जिवंत करत आहात, असा आरोपही ओवैसींनी केला आहे.  बंगाली हिंदू आता सांगतील आम्ही भारतीय आहोत. एनआरसी करून सीएबी घेऊन याल, पण सीएबी हे आंबेडकर आणि गांधींच्या विरोधात आहे. प्रादेशिक पक्ष हे लोकशाहीसाठी चांगले आहेत. भाजपाला कोणत्याही विषयाचं देणं-घेणं नाही. महाराष्ट्रातही आमचे दोन आमदार आणि एक खासदार निवडून आलेले आहेत. आमचा राष्ट्रीय पक्ष नाही. इम्तियाज जलील शिवसेनेला हरवून खासदार झाले. इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांमुळे दिल्ली-औरंगाबाद तीन विमानांची सेवा सुरू झाली. निवडणुकीदरम्यान पावसानं अनेक पिकांची नासधूस झाली, असे मुद्दे इम्तियाज जलील यांनी उचलून धरले. प्रादेशिक मुद्द्यांवर राष्ट्रीय पक्ष जास्त लक्ष देत नसल्याचंही ओवैसींनी अधोरेखित केलं आहे.लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात. सोहळ्याआधी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम सभागृहात ‘राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, असदुद्दीन ओवैसी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले असून, त्यांनी मतप्रदर्शन केलं आहे. 2017पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली असून, 2018मध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एन. के. प्रेमचंद्रन, निशिकांत दुबे, सुष्मिता देव, रमादेवी, मीनाक्षी लेखी, हेमामालिनी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पहिल्या वर्षी शरद पवार, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, जया बच्चन, कनिमोळी, रजनी पाटील, छाया वर्मा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यात ग्रामपंचायत, विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आता पुरस्काराने गौरविले जाते.

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक