नवी दिल्लीमध्ये आज लोकमत नॅशनस कॉन्क्लेव्ह २०२५ चं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध चर्चासत्रांमधून मान्यवरांनी आपले विचार मांडले. यादरम्यान, भारतीय लोकशाहीचे स्तंभ आणि शक्तीबाबत अभिषेक मनू सिंघवी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.
या कार्यक्रमामधील चर्चासत्रामध्ये लोकशाहीसाठी सर्वाधिक काय आवश्यक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की की, भारतातील सर्व शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक संस्था ह्या लोकशाहीचे स्तंभ आहेत. तसेच संसद, निवडणूक आयोग आणि लष्कर हे आमच्या लोकशाहीचे स्तंभ आहेत, असेही अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.
यावेळी चर्चासत्रात सहभागी झालेले माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी घटनेचा आत्मा, मानवीय गरिमा आणि सामाजित न्याय या विषयांवर भर दिला. तसेच न्यायपालिका आणि कार्यपालिका मिळून विकसित भारताचं लक्ष्य कसं प्राप्त करू शकतात, यावर त्यांनी आपल्या भाषणामधून प्रकाश टाकला. तसेच घटनात्मक मर्यादा कायम राखल्या पाहिजेत ही बाबही अधोरेखित केली.
Web Summary : At Lokmat National Conclave 2025, Abhishek Manu Singhvi highlighted educational institutions, Parliament, Election Commission, and the military as pillars of Indian democracy. Former Chief Justice B.R. Gavai emphasized constitutional spirit, human dignity and social justice.
Web Summary : लोकमत नेशनल कॉन्क्लेव २०२५ में, अभिषेक मनु सिंघवी ने शैक्षणिक संस्थानों, संसद, चुनाव आयोग और सेना को भारतीय लोकतंत्र के स्तंभ बताया। पूर्व मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई ने संवैधानिक भावना, मानवीय गरिमा और सामाजिक न्याय पर जोर दिया।