शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 06:59 IST

या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. 

आदेश रावल -नवी दिल्ली : काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. आघाडी समितीने त्यासाठी आधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि नंतर जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविला.

या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. 

जागा किती हा विषय नंतरचाकाँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक अशाप्रकारे एफआरपीचे तुकडे केले. भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड केली. रस्त्यालगत जमिनीचा शेतकऱ्यांना चार ते पाच पट मोबदला मिळायचा त्या कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळे याचे नेमके काय करणार याचे स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही. जागा किती हा विषय नंतरचा आहे.  - राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

दृष्टिकोन बदलला?भाजपविरोधात एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी अनेक निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवल्या आहेत. तेव्हाचे जागावाटप बघता काँग्रेसचा दृष्टिकोन बदलला असेल तर आम्हाला माहित नाही. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कुठे ठरला जागांचा फॉर्म्युला?काँग्रेसचे संयोजक मुकुल वासनिक, सलमान खुर्शिद, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मोहन प्रकाश या आघाडी समितीने देशातील प्रदेश काँग्रेस नेत्यांशी २९-३० डिसेंबर या दोन दिवसांमध्ये चर्चा केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी २७ जागांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र जागावाटपाच्या वाटाघाटीची सुरुवात २१-२२ जागांपासून सुरू करण्यात येणार आहे. चर्चेअंती दोन-तीन जागांवर पाणी सोडण्यासही पक्ष तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभेची तयारी सुरू; राष्ट्रवादीस कमी जागा, आंबेडकर, शेट्टींना स्थान ‘वंचित’बाबत खरगे निर्णय घेतील. प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा व्हावी, असे शरद पवार यांचे मत होते; पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे घेतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशीच चर्चा करा.

यावरून खलबतेजागावाटपात मिलिंद देवरा यांची मुंबईतील जागा अडकली आहे. येथे शिवसेनेचे खासदार आहेत. राजू शेट्टी यांच्या पक्षाला एक जागा देण्यात येणार असली, तरी ही जागा काँग्रेसच्या कोट्यातून कमी करण्यात येईल.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेlok sabhaलोकसभा