शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:43 IST

CSDS-Lokniti Pre-Poll Survey: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या बहुमतासह सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनेल, अशी आशा आहे. यातच एक सर्व्हे भाजपचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरापेक्षाही देशातील अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे अधिक महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे. मतदार या मुद्द्यावर मतदान करू शकतात. यातच विरोधीपक्षाने बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या बहुमतासह सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनेल, अशी आशा आहे. यातच एक सर्व्हे भाजपचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो.

बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि बिघडती आर्थिक परिस्थिती मतदारांसाठी महत्वाची आहे आणि याच मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात, असे सीडीएस लोकनीती प्री पोल सर्व्हेमधून समोर आले आहे. गरीब-मध्यमवर्गावर अधिक परिणाम - अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा सर्वाधिक परिणाम हा गरीब आणि मध्यमवर्गावर होत आहे. श्रीमंत वर्गावर याचा फारसा परिणाम होत नाही. देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर अहे, असे निर्देशांकांतून दिसत असले तरी, मतदारांवर मात्र त्याचा परिणाम जाणवत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी दोन तृतीयांश पेक्षाही अधिक लोकांनी, पूर्वीच्या तुलनेत आता नोकरी मिळणे अधिक कठीण झाले आहे आणि ही संख्या शहरी पुरुषांमध्ये अधिक आहे, असे म्हटले आहे. तर तीन चतुर्थांश लोक बेरोजगारीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हणत आहेत.

गरिबांना होतोय त्रास - गेल्या 5 वर्षांत महागाई वाढली आहे, असे दोन तृतीयांश लोकांना वाटते. ग्रामीण भागातील गरीब लोकांना याचा अधिक फटका बसत आहे. तर शहरातील मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गावर याचा फारसा परिणाम नाही. वाढत्या महागाईसाठी बहुतांश लोक केंद्र सरकारलाच जबाबदार धरत आहेत. 2019 च्या तुलनेत अधिक लोकांना वाटते की, आता ते आपला खर्च काढल्यानंतर, बचत करू शकतात. मात्र, घर चालवण्यातही अडचणी येत असल्याचे 50 टक्के लोकांना वाटते. 

महत्वाचे म्हणजे, बेरोजगारी आणि महागाई हे आगामी निवडणुकीत सर्वात महत्वाचे मुद्दे असतील, असे तब्बल 50 टक्के लोकांना वाटते. 2019 मध्ये सहा पैकी केवळ एका व्यक्तीलाच हा मुद्दा महत्वाचा वाटत होता. मात्र 2024 मध्ये स्थिती बदलली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाElectionनिवडणूकRam Mandirराम मंदिरInflationमहागाईUnemploymentबेरोजगारीcongressकाँग्रेस