शहरं
Join us  
Trending Stories
1
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
2
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
3
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
4
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
5
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
6
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
7
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
8
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
9
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
10
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
11
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
12
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
13
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
14
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
15
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
16
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
17
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
18
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
19
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
20
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे

सूरतची जागा बिनविरोध, मग 'NOTA' पर्यायाचं काय? ते बटण कशासाठी?; सोशल मीडियावर चर्चा

By ravalnath.patil | Updated: April 26, 2024 16:46 IST

Lok Sabha elections 2024: 'नोटा' पर्याय वापरून बिनविरोध उमेदवारासह इतर उमेदवारांचा निषेध करण्याची संधीही इतर मतदारांना गमवावी लागते. त्यामुळे 'नोटा' पर्यायाचं काय? असा प्रश्न मतदारांना पडत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच उमेदवारांनी विजयासाठी जीवाचं रान केलं आहे. अशातच गेल्या तीन-चार दिवसांपासून गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघाची चर्चा जोरदार सुरू आहे. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपानं खातं उघडलं आहे. छाननीवेळी काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्यानं सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी मुकेश दलाल यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना प्रमाणपत्र दिलं. यानंतर, बिनविरोध निवड ही एक प्रकारे लोकशाहीची लूट आणि बळजबरीच आहे, असं म्हणत काँग्रेससह विरोधकांनी भाजपावर हल्लाबोल केला. "सूरतमध्ये विरोधी उमेदवार एक तर बाद केले किंवा निवडणुकीच्या रिंगणातून गायब केले. लोकशाहीचे हाल काय आहेत?, हे सुरत लुटमार प्रकरणात दिसून आले", असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला.  

सूरत लोकसभा जागेवर भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. या जागेवर नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. भाजपाला व्यापारी समुदायाची भीती वाटत होती, त्यामुळेच त्यांनी सूरत लोकसभा मतदारसंघात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला, असा दावाही काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे एकूण १६ तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामुळे सूरत लोकसभा निवडणुकीत एकप्रकारे ट्विस्ट आला आहे. 

दुसरीकडे, सोशल मीडियातूनही बिनविरोध निवडीवरून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेष म्हणजे,  'नोटा' (NOTA: None of the Above) या पर्यायाचं काय? मतदारांच्या 'नोटा' निवडण्याच्या अधिकारावर गदा येणार नाही का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर नेटिझन्सकडून विचारण्यात आले. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनाही याबाबत प्रश्न उपस्थित केला. काहीही कारणांमुळे जरी एकच उमेदवार असेल तरीही तो उमेदवार विरुद्ध नोटा अशी दुरंगी लढत होऊ शकते. निवडून तोच येईल पण मतदानाचा हक्क तर बजावता येईल आणि त्या उमेदवाराविषयी लोकांचं खरं मत तरी कळेल. नोटा पर्याय नसताच तर भाग वेगळा, पण असतानाही तो राबवलाच गेला नाही तर त्याला 'बिनविरोध' कसं म्हणायचं? असा सवाल समीर विद्वांस यांनी केला आहे.

इतिहास पाहिला तर सूरत लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात बिनविरोध निवडून आलेले मुकेश दलाल हे पहिले उमेदवार आहेत. पंरतु, गुजरातच्या राजकारणातील हे पहिलेच प्रकरण असले तरी यापूर्वीही देशात अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. विशेष म्हणजे, देशात निवडणुका बिनविरोध जिंकण्याची प्रथा स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाल्याचं समोर येतं. १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये कोईम्बतूरमधील इंडियन नॅशनल काँग्रेसचे टीए रामलिंगा चेट्टियार, ओरिसातील रायगड फुलबनी येथील टी संगना, बिलासपूरमधून काँग्रेसचे आनंद चंद, सौराष्ट्रातील हलारमधून मेजर जनरल एचएस हिम्मत सिंगजी आणि हैदराबादमधील यादगीरमधून कृष्णाचार्य जोशी यांचा समावेश आहे. हे सर्व काँग्रेसचे उमेदवार होते. देशाच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत आणखी एक विक्रम झाला. तो म्हणजे १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे सर्व काँग्रेसचे उमेदवारही होते. यानंतर १९६२ मध्ये तीन आणि १९६७ मध्ये पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे देखील काँग्रेसचेच होते. त्यामुळे इतिहास पाहिला तर आतापर्यंत काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचा विक्रम आहे. 

याशिवाय, १९६७ मध्ये नागालँडच्या एनएनओ पक्षाचे उमेदवारही बिनविरोध विजयी झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे मोहम्मद शफी भट्ट १९८९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधून बिनविरोध विजयी झाले होते. यापूर्वी नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला हेही १९८० मध्ये श्रीनगरमधून बिनविरोध निवडून आले होते. २०१२ मध्ये पोटनिवडणुकीत डिंपल यादव कन्नौजमधून बिनविरोध विजयी झाल्या होत्या. मात्र, देशाच्या निवडणूक प्रक्रियेत 'नोटा' हा पर्याय २०१३ पासून लागू झाला आहे आणि म्हणूनच सूरतमधील बिनविरोध निवडीवर अनेकांच्या नजरा लागल्यात. लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणं गरजेचं आहे. मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा संविधानानं दिलेला अधिकार असून, मतदानाचा हक्क बजावणं हे आपले कर्तव्य आहे, असं निवडणूक आयोगाकडून वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत बिनविरोध निवडीमुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क गमवावा लागतो. याशिवाय, 'नोटा' पर्याय वापरून बिनविरोध उमेदवारासह इतर उमेदवारांचा निषेध करण्याची संधीही इतर मतदारांना गमवावी लागते. त्यामुळे 'नोटा' पर्यायाचं काय? असा प्रश्न मतदारांना पडत असल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाचा नियम काय म्हणतो?बिनविरोध निवडणूक होते, तेव्हा उमेदवाराला एकही मत न देता विजयी घोषित केलं जातं. यासंदर्भात निवडणूक आयोगानं आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही माहिती दिली आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, जर एखाद्या मतदारसंघात फक्त एकच उमेदवार निवडणूक लढवत असेल तर तो रीतसर निवडून आल्याचे घोषित केले जाईल, अशा स्थितीत मतदानाची गरज नाही. जेव्हा इतर उमेदवार एकतर त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतात किंवा काही कारणांमुळे त्यांचे नामांकन रद्द केले जाते, तेव्हा असं घडतं. यानंतर मतदारसंघाात फक्त एकच उमेदवार निवडणूक लढवत असेल तर त्याला निवडणूक आयोगाकडून विजयी घोषित करून प्रमाणपत्रही देण्यात येते.

नोटा म्हणजे काय?तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार पसंत नसेल किंवा तुम्हाला निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी कुणालाही मत द्यायचं नसेल, तर तुम्ही काय कराल? तर त्यासाठी निवडणूक आयोगानं नोटा (NOTA) म्हणजेच 'None of the Above' चा पर्याय मतदारांना दिला आहे. तुम्ही नोटा पर्यायाचं बटण दाबून तुमचा निषेध नोंदवू शकता. नोटा बटण दाबणं म्हणजे निवडणूक लढवणारा एकही उमेदवार तुमच्या मते पात्र नाही किंवा वरीलपैकी कोणताच उमेदवार तुम्हाला आवडत नाही, असं मत देता येतं. दरम्यान, अशाप्रकारे निवडणूक प्रक्रियेत नोटाचा पर्याय उपलब्ध करून देणारा भारत हा जगातील चौदावा देश आहे. देशाच्या निवडणुकीत प्रक्रियेत नोटा हा पर्याय २०१३ पासून लागू झाला आहे. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर करण्यात आला होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४surat-pcसूरतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकVotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीनBJPभाजपाcongressकाँग्रेस