शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 12:39 IST

Lok Sabha Elections 2024 And Uma Bharti : उमा भारती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "सोनिया गांधी अजूनही स्वत:ला राणी आणि राहुल यांना राजकुमार समजतात" असं म्हणत निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थनार्थ शिवपुरीच्या पिछोर येथे आयोजित जाहीर सभेत उमा भारती यांनी असं म्हटलं आहे. 

"देश स्वतंत्र झाला आहे, परंतु सोनिया गांधी आणि राहुल गांधी अजूनही स्वतःला राणी आणि राजकुमार समजतात. हे दोघेही भ्रष्टाचार प्रकरणात जामिनावर आहेत. काँग्रेसने भूतकाळात अशा चुका केल्या आहेत की आता त्याबद्दल काही बोलणेही योग्य नाही" असं म्हणत उमा भारती यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"काँग्रेसने आपल्या राजवटीत देशाला अडचणीत आणण्याचं काम केलं. काँग्रेसने देशात आणीबाणी लावली आणि सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले. देशातील शीख दंगली  केल्या, या सर्व काँग्रेसच्या कारवाया आहेत. काँग्रेसने भूतकाळात इतक्या चुका केल्या आहेत की, आज काँग्रेसबद्दल बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. देशातील जनतेला काँग्रेसबद्दल सर्व माहिती आहे" असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे. 

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, "भारताला विश्वगुरू म्हणून स्थापित करण्याचे आणि देशाच्या विकासाला गती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक घरातील प्रत्येक मतदाराने सात मे रोजी मतदानासाठी यावे आणि भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद द्यावा." 

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४