शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अमित शहांचा विरोधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 17:02 IST

आघाडी देशाचं भलं करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला

मुरादाबाद - विरोधी पक्षाकडे ना नेता आहे, ना निती आहे, स्वार्थासाठी एकत्र येऊन या पक्षांनी आघाडी केली. या लोकांना कोणताही विचार नाही. धोरण नाही. नेतृत्वहिन आघाडी आहे. ही आघाडी देशाचं भलं करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अमित शहा हे भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला संबोधित करत होते.

यावेळी अमित शहा म्हणाले की, भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएसोबत आगामी निवडणुकीत उतरली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि विरोधी नेते आघाड्या घेऊन पुढे आहे. आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर आमचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील हे आमचे ठरलेलं आहे. मात्र तुमचे नेतृत्व कोण आहे? देशात मौनीबाबा मनमोहन सिंग यांचे सरकार नाही तर नरेंद्र मोदी यांचे सरकार हवंय. 

पाकिस्तानच्या घरात घुसून आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचं काम भाजपा करत आहे. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पूर्ण देश आक्रोशात होता. पाकिस्तानकडून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आलं पाकिस्तानला मोदी सरकारची भिती वाटत होती त्यांना वाटत होतं की पुन्हा भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल मात्र मोदींनी हवाई स्ट्राइक करत पाकिस्तानला जोरदार धडा शिकवला. आपल्या सीमेशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं हे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं. एअर स्ट्राइकनंतर देश आनंदात होता तर काँग्रेसचे मंडळी दुख: व्यक्त करत होती असंही अमित शहा म्हणाले. 

शत्रू गोळी चालवत असेल तर गोळीनेच उत्तर दिले जाईल हे भारतीय जनता पार्टीचे धोरण आहे. देशाच्या सैन्यावर गौरव करणे ही आमची पार्टी आहे तर तुम्ही पुरावे मागत आहे. पाकिस्तानचा मिडीया पहा, मग तुम्हाला समजेल मोदींनी पाकिस्तानसोबत काय केलं आहे. देशातील जवानांवर संशय व्यक्त करताय हा देशातील शहीदांचा अपमान आहे असा टोला अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला. दहशतवाद्यांनी जशास तसं उत्तर देणारा पंतप्रधान हवा, 30 वर्ष तुम्ही दहशतवाद्यांना बिर्याणी खायला देत होता मात्र आता हे दिवस गेले. आता पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर दहशतवाद्यांच्या मनात धडकी भरेल असा नेता हवा. नरेंद्र मोदीशिवाय देशाचे नेतृत्व करेल असा नेता कोणीच नाही असंही अमित शहा यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीNarendra Modiनरेंद्र मोदी