शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अब की बार 280 पार; एनडीएची सत्तावापसी होणार- सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 09:41 IST

एनडीए, यूपीएला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज

नवी दिल्ली: येत्या लोकसभा निवडणुकीत एनडीए सत्ता कायम राखेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाईम्स नाऊ-व्हीएमआर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून याबद्दलची आकडेवारी समोर आली आहे. यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला 283 जागा मिळू शकतील. तर काँग्रेसप्रणित यूपीएला 135 आणि इतरांना 125 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागा कमी होताना, तर यूपीएच्या जागा वाढताना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा एनडीएला मिळालेल्या मतांचा टक्का वाढेल असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 38.5 टक्के मतं मिळाली होती. यंदा एनडीएला 40.1 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे यूपीएला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीतदेखील चांगली वाढ होऊ शकते. गेल्या निवडणुकीत यूपीएला 23 टक्के मतं मिळाली होती. यंदा त्यांना 30.6 टक्के मतं मिळू शकतात. या सर्वेक्षणात 17 हजार लोकांचा सहभाग होता, अशी माहिती टाईम्स नाऊ-व्हीएमआर यांनी दिली. हिंदी भाषिक पट्ट्यात एनडीएला मोठं यश मिळेल, असा अंदाज आहे. याशिवाय ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्येही एनडीएला चांगलं यश मिळू शकतं. भाजपालामध्य प्रदेशात 29 पैकी 22, राजस्थानात 25 पैकी 20 आणि छत्तीसगडमध्ये 11 पैकी 6 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीनच महिन्यांपूर्वी या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसला फारसं यश मिळण्याची शक्यता नाही. काँग्रेसला मध्य प्रदेशात 7, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 5 जागा मिळतील, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या आघाडीमुळे भाजपाच्या जागा घटतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाला 36 जागांवर, तर एनडीएला 42 जागा मिळू शकतील.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थान