शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील भाजपाच्या 16 उमेदवारांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 20:38 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना आज भारतीय जनता पार्टीने आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना आज भारतीय जनता पार्टीने आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नावासोबत नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी अशा दिग्गज भाजपा नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीमध्ये बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिल्याचं पाहायला मिळालं, नागपूरमधून नितीन गडकरी, रावेरमधून एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे, जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे, चंद्रपूर येथून हंसराज अहिर, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे, भिवंडीतून कपिल पाटील, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, बीडमधून प्रीतम मुंडे, मुंबई पश्चिम मध्य मुंबईतून पूनम महाजन, वर्धा येथून रामदास तडस, चिमूरमधून अशोक नेते, सांगली येथून संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे

 

तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करत याठिकाणी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी संधी देण्यात आली आहे. तर लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल गायकवाड यांच्याऐवजी सुधाकरराव श्रृंगारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा पहिल्या यादीत करण्यात आली नाही. या लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियूष गोयल लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छुक आहेत. ईशान्य मुंबईत सध्या भाजपाचे किरीट सोमय्या हे खासदार आहेत. सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेने विरोध केला आहे त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा या पहिल्या यादीत समावेश केलेला नाही.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीraosaheb danveरावसाहेब दानवेPritam Mundeप्रीतम मुंडेSujay Vikheसुजय विखे