शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
2
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
3
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
4
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
5
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
6
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
7
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
8
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
9
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
10
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
11
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
12
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
13
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
14
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
15
Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
16
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
17
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
18
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
19
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
20
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...

TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:57 IST

loksabha Election Result - देशात एनडीएचं सरकार पुन्हा येणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होतंय पण तत्पूर्वी घटक पक्षांच्या मागणीत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता देशात नवं सरकार बनण्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. तेलुगु देसम पार्टी(TDP) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्यात सरकार बनवण्यासाठी सहमती बनली आहे. त्यानुसार केंद्र सरकारमध्ये १ कॅबिनेट आणि २ केंद्रीय राज्यमंत्रिपदे टिडीपीला देण्याबाबत मान्यता मिळाली आहे. लवकरच टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू पुन्हा दिल्लीत पोहचत आहेत. 

यंदाच्या लोकसभेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपाला सर्वाधिक २४० जागा मिळाल्या आणि भाजपा नेतृत्वातील एनडीएकडे बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे केंद्रात घटक पक्षांना सोबत घेऊनच भाजपाला सरकार चालवावं लागणार आहे. इंडिया आघाडीकडून एनडीएच्या घटकपक्षांना ऑफर देण्यात येत आहे. ज्यामुळे राजकीय हालचाली दिल्लीत सुरू आहेत. एनडीए सरकार बनवणार हे चित्र असलं तरी अद्याप सस्पेन्स कायम आहे. 

दिल्लीत ५ जूनला पंतप्रधान निवासस्थानी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत घटक पक्षांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे पाठिंबा पत्र दिलं आहे. त्यासोबतच नरेंद्र मोदी यांची नेतेपदी सर्वसमंतीने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे एनडीएचं सरकार बनणार अशी स्थिती आहे. परंतु मंत्रिमंडळावरून एनडीएच्या घटक पक्षांमध्ये काही पेच निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

दरम्यान, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा, कॅबिनेट मंत्रि‍पदाशिवाय सिंचन योजनेसाठी आणि नव्या अमरावती राजधानीसाठी केंद्राकडून अधिकचा निधी हवा आहे. आम्हाला आमचा हक्क मिळेल आणि एनडीएतील मजबूत भागीदार आहोत असं विधान टीडीपी प्रवक्त्या ज्योत्सना तिरुनागरी यांनी केले आहे. 

घटक पक्षांच्या मागणीत वाढ

लोकसभा निवडणूक निकालात गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपाची पिछेहाट झाल्याचं पाहून एनडीएतील घटक पक्षांच्या मागणीत वाढ झाली आहे. प्रत्येक पक्ष अधिकची मंत्रि‍पदे मागत आहे. एनडीएला २९३ जागांसह बहुमत मिळालं आहे. त्यात भाजपाला २४० जागा, तेलुगु देसम पार्टीला १६ आणि जनता दल यूनाइटेडला १२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे जेडीयू आणि टीडीपी हे किंगमेकर बनले आहेत.  

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल