Lok Sabha election results 2019: virat kohli congratulates narendra modi | लोकसभा निवडणूक निकाल 2019 : नरेंद्र मोदींचे कोहलीने केले खास शब्दांत अभिनंदन
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : नरेंद्र मोदींचे कोहलीने केले खास शब्दांत अभिनंदन

लंडन : लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरु झाला, यामध्ये भारतीय खेळाडूही पिछाडीवर नाहीत. भारताचा कर्णधार विराट कोहलीने थेट लंडनमधून मोदी यांचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे.

कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोहली आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, " नरेंद्र मोदी जी, तुमचे अभिनंदन. तुमच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वोच्च उंचीवर जाईल, हा आम्हाला विश्वास आहे. जय हिंद..."

हे पाहा कोहलीचे ट्विट


भाजपाच्या अभूतपूर्व यशावर सचिन तेंडुलकरचा 'मास्टर' स्ट्रोक
भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निडवणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करताना एकहाती सत्तेच्या दिशेनं कूच केली आहे. सध्या हाती असलेल्या आकडेवारीनुसार भाजपा सरकार 349 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्ष भाजपाचीच सत्ता असणार आहे, हे निश्चितच आहे. भाजपाच्या या अभूतपूर्व यशावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट केले आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे कौतुक केले आहे.

तो म्हणाला, नरेंद्र मोदीजी आणि भाजपा यांच्या अभूतपूर्व यशाचे कौतुक. नवीन भारताच्या बांधणीसाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे.'' Web Title: Lok Sabha election results 2019: virat kohli congratulates narendra modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.