शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 16:57 IST

भाजपाकडून काँग्रेसचा पालापाचोळा

नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या 44 जागांवर घसरलेल्या काँग्रेसची कामगिरी यंदादेखील फारशी चांगली झालेली नाही. सध्या काँग्रेसला 50 च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपा आणि मित्रपक्षांनी तब्बल साडेतीनशे जागांवर आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली होती. ही घोषणा जवळपास 14 राज्यांमध्ये खरी ठरताना दिसते आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसला भोपळादेखील फोडता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. जम्मू काश्मीर- राज्यातील एकूण 6 जागांपैकी 3 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर उर्वरित तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स पुढे आहे. राज्यात काँग्रेस आणि पीडीपीला एकाही मतदारसंघात यश मिळताना दिसत नाही. आंध्र प्रदेश- दक्षिण भारतातलं प्रमुख असलेल्या आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. यापैकी 24 जागांवर वायएसआर काँग्रेस, तर एका जागेवर टीडीपी पुढे आहे. अरुणाचल प्रदेश- चीनच्या सीमेला लागून असलेल्या या राज्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. या दोन्ही जागांवर भाजपा विजयासमीप आहे. गुजरात- पंतप्रधान मोदींच्या होमग्राऊंडमध्ये भाजपानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. राज्यातील 26 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. 2014 मधील विजयाची भाजपानं पुनरावृत्ती केली. हरियाणा- राज्यातील सर्वच्या सर्व 10 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. हिमाचल प्रदेश- राज्यातील चारही जागांवर भाजपानं कब्जा केला आहे. गेल्या निवडणुकीतही भाजपानं या राज्यात सर्व जागा मिळवल्या होत्या. उत्तराखंड- उत्तर भारतातलं डोंगराळ राज्य असलेल्या उत्तराखंडमधील पाचही जागांवर भाजपाचे उमेदवार पुढे आहेत. मणीपूर- राज्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. यातील एका जागेवर भाजपा, तर एका जागेवर नागा पीपल्स फ्रंट आघाडीवर आहे. मिझोराम- राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघात मिझो नॅशनल फ्रंट पुढे आहे. ओडिशा- राज्यातील एकूण 21 जागांपैकी 14 जागांवर सत्ताधारी बिजू जनता दल, तर 7 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. दिल्ली- राजधानी दिल्लीत काँग्रेस आणि आप आघाडी करणार अशी चर्चा होती. मात्र या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवली. त्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसला आहे. भाजपा दिल्लीतील सातही मतदारसंघात पुढे आहे. राजस्थान- राज्यातील सर्वच्या सर्व 25 मतदारसंघात काँग्रेसची धूळधाण होताना दिसत आहे. 24 मतदारसंघात भाजपा, तर एका मतदारसंघात मित्रपक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आघाडीवर आहे. सिक्कीम- ईशान्य भारतातील सिक्कीममधील एकमेव मतदारसंघात सिक्किम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर आहे. त्रिपुरा- राज्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानJammu Kashmirजम्मू-काश्मीरAndhra Pradeshआंध्र प्रदेशsikkimसिक्किमmizoram-pcमिजोरमGujaratगुजरातOdishaओदिशा