शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : लाखांच्या लीडने दिल्लीत सर्वच जांगावर भाजपचा भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 03:33 IST

२०१९ मधील दिल्लीत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असल्यास कॉँग्रेस आणि ‘आप’ ला आघाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

- विकास झाडेदिल्लीत २०१४ मधील निकालाची पुनरावृत्ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झाली आहे. सातही जागांवर भाजपने भगवा फडकवला. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि कॉँग्रेसची आघाडी न झाल्याने दोन्ही पक्षाला कपाळावर हात मारून घ्यावा लागला आहे. दोन्ही पक्षांच्या मतांची गोळाबेरीज भाजपच्या विजयी उमेदवरांपेक्षा अधिक आहे.

२०१९ मधील दिल्लीत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असल्यास कॉँग्रेस आणि ‘आप’ ला आघाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही पक्षाने एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप कमी करीत मवाळ धोरण स्वीकारले. दिल्लीतील ७ पैकी एकही जागा आपल्याला मिळणार नाही याची खात्री भाजपला होती. ज्या दिवशी आप आणि कॉँग्रेसच्या आघाडीला पूर्णविराम मिळाला असे लक्षात आले तेव्हाच दिल्लीतील सातही जागांवर भाजपचे उमेदवार निवडूण येतील हे स्पष्ट झाले होते. दिल्लीत नऊ महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव दिल्लीत अद्यापही दिसत असला तरी आज झालेल्या मतमोजणीनंतर सात पैकी पाच जागांवर आप तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेली आहे.झारखंड । कमळ पुन्हा फुललेझारखंडमध्ये २०१४ च्याच निकालांची पुनरावृत्ती होऊन भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. त्यांना १२ जागा मिळाल्या आहेत. यात गिरिदीह येथून आॅल झारखंड स्टुडंटस् युनियनच्या चंद्रपकाश चौधरी यांचा समावेश आहे. यावेळेचे वैशिष्ट्य म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन आणि झारखंड विकास मंचचे बाबूलाल मरांडी यांना जनतेने नाकारले. तब्बल आठ वेळा खासदार राहिलेले शिबू सोरेन गेल्यावेळी मोदी लाटेतही निवडून आले होते परंतु यावेळी सुनील सोरेन यांनी वचपा काढला आहे. कोडरमा मतदारसंघात बाबुलाल मरांडी यांचा भाजपच्या अन्नपूर्णा देवी यांनी पार धुव्वा उडवला. माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे मात्र भाजपकडून खुंटी मतदारसंघात फक्त दोन हजाराच्या फरकाने निवडून आले. गेल्यावेळी काँग़्रेसला एकही जागा मिळाली नव्हती पण त्यांनी यावेळी किमान आपले खाते खोलले आहे.

पुड्डुचेरी । काँग्रेसने जागा पटकावलीकाँग्रेसने पुड्डूचेरी येथील आपली पांरपरिक जागा राखण्यात यश मिळविले आहे. येथे काँग्रेसचे राज्य सरकार असून तामिळी राजकारणाचा थेट प्रभाव दिसत होता. काँग्रेसच्या व्ही. व्हैथलिंगम यांनी आपल्या जवळच्या प्रतिस्पर्धावर निर्णायक आघाडी घेतली आहे. २०१४ मध्ये ही जागा एआयएनआर काँग्रेसने जिंकली होती.केरळ । केरळात नो डावे, नो भाजप; डाव्यांच्या बालेकिल्ल्यात कॉँग्रेसची मुसंडीएकीकडे संपूर्ण देशात भाजपची त्सुनामी आली असताना ‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाºया केरळात मात्र काँग्रेसने डावे आणि भाजपचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत केरळमध्ये आपलीच ‘हवा’ असल्याचे दाखवून दिले. केरळमधील २० लोकसभा जागांपैकी काँग्रेस प्रणीत संयुक्त लोकशाहीवादी आघाडीने तब्बल १९ जागांवर विजय मिळविला. तर राज्यात सत्तेवर असणाºया माकप प्रणीत डाव्या आघाडीने केवळ एक जागा जिंकली. विशेष म्हणजे शबरीमाला मुद्द्यावरून जातीय राजकारणाचे कार्ड खेळू पाहणाºया भाजपचीही केरळीयन मतदारांनी डाळ शिजू दिली नाही.

राहुल यांना ४ लाखांचे मताधिक्यकेरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ४ लाख ३१ हजार ७७० मतांचे मताधिक्य घेत देशात नवा विक्रम केला आहे.लक्षद्वीप । पुन्हा फैजलचलक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहम्मद फैजल यांनी काँग्रेसच्या हमीदुल्ला सईद यांचा पराभव केला आहे. फैजल यांनी सईद यांचा अवघ्या ८१६ मतांनी पराभव केला आहे. फैजल यांना २२ हजार ७९६ मते मिळाली. तर सईद यांना २१ हजार ९८० मते मिळाली. केवळ एक जागा असणाºया लक्षद्वीपमध्ये भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोठा जोर लावला होता. सलग १० वेळा काँग्रेसच्या पी. एम. सईद यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ुल गांधी यांच्याविरोधात वायनाडमध्ये माकपचे पी. पी. सुनीर व भारतीय धर्म जनसेनेचे तुषार वेरापल्ली यांनी आव्हान उभे केले होते.

 

अंदमान । काँग्रेसला मिळाली आघाडीअंदमान निकोबार बेटावरील एकमेव जागासाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये येथे काटाजोड लढत होती. भाजपच्या विशाल जॉली यांनी काँग्रेसच्या कुलदीप रॉय शर्मा यांच्याविरोधात आघाडी घेतली होती. विजयाचेपारडे वर-खाली होत आहे. एकमेव जागा असली तरी येथे काँग्रेस, भाजपसह आप, तृणमूल काँग्रेस, बसपा यांचे उमेदवारदेखील रिंगणात होते. २०१४ मध्ये भाजपच्या बिष्णू पाडा रॉय यांनी येथून विजय मिळविला होता.

टॅग्स :Delhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस