शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : इंदूरच्या भाजप उमेदवाराचा १० लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय, नोटानंही केला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 19:40 IST

Lok Sabha Election Result 2024 Madhya Pradesh : इंदूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारानं आज एक विक्रम केला. इतकंच नाही, तर या ठिकाणी नोटानंही विक्रम केला आहे.

Lok Sabha Election Result 2024 Madhya Pradesh : इंदूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारानं आज एक विक्रम केला. इतकंच नाही, तर या ठिकाणी नोटानंही विक्रम केला आहे. भाजपचे शंकर लालवानी १०,०८,०७७ मतांनी विजयी झाले. शंकर लालवानी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून विक्रम तर रचलाच, पण भाजपनं ही जागा ३५ वर्षे आपल्याकडेच ठेवली आहे. इंदूरमध्ये आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस पहिल्यांदाच निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. शंकर लालवानी यांना १२ लाख २६ हजार ७५१ मते मिळाली. लालवानी यांचे प्रतिस्पर्धी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार संजय सोळंकी यांना ५१ हजार ६५९ मते मिळाली. 

'नोटा'ला विक्रमी मते 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असलेल्या २९ एप्रिल रोजी काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघाच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली. यानंतर काँग्रेसनं स्थानिक मतदारांना ईव्हीएमवरील 'नोटा'चं बटण दाबून भाजपला धडा शिकवण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी इंदूरमध्ये नोटाला २ लाख १८ हजार ६७४ मतं मिळाली, हा एक विक्रम आहे. 

लालवानी काय म्हणाले ? 

शंकर लालवानी यांनी आपल्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिलं. इंदूरमधील भाजपचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या 'नोटा'च्या आवाहनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसनं नकारात्मक भूमिका घेतली असल्याचं ते म्हणाले.  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लालवानी यांनी त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पंकज संघवी यांचा ५.४८ लाख मतांनी पराभव केला होता. खासदारकीच्या नव्या कार्यकाळात वाहतूक, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण या क्षेत्रांना प्राधान्य देऊन इंदूरमध्ये काम असल्याचंही लालवानी म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmadhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४