Lok Sabha Election Result 2019 Live Vote Counting News & Winners, State Wise & Party Wise Results in Marathi | लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: भाजपाचा 300 हून अधिक जागांवर विजय, तर काँग्रेसने गाठले अर्धशतक
लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: भाजपाचा 300 हून अधिक जागांवर विजय, तर काँग्रेसने गाठले अर्धशतक

Today’s Lok Sabha Election Live Result 2019:  सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेले कल आणि  निकालांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 340 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपानेही स्वबळावर 300 पार मजल मारण्याच्या दिशेने कूच केली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा एकदा दाणादाण उडाली असून, काँग्रेस आणि मित्रपक्ष 90 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्ष 110 जागांवर आघाडीवर आहेत.  

LIVE

Get Latest Updates

08:54 AM

अमेठीत आज नवी पहाट उगवली आहे, विजयानंतर स्मृती इराणींची प्रतिक्रिया 

07:59 AM

मुझफ्फरनगर मतदारसंघात भाजपा नेते संजय बलियान विजयी 

07:13 AM

सिक्किम क्रांतिकारी मोर्चाला सिक्किम विधानसभेत बहुमत 

05:47 AM

चंदिगड लोकसभा मतदारसंघातून भाजपा नेकत्या किरण खेर 46 हजार 970 मतांनी विजयी 

05:45 AM

तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून शशी थरूर 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी 

05:38 AM

झारखंडमधील खुंटी मतदारसंघातून भाजपा नेते अर्जुन मुंडा 1445 मतांनी विजयी 

03:48 AM

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद पाटणासाहीब मतदारसंघातून 2 लाख 84 हजार 657 मतांनी विजयी 

03:17 AM

केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह बागपत मतदारसंघातून 23 हजार 502 मतांनी पराभूत, रालोदचे जयंत चौधरी पराभूत 

03:15 AM

हजारीबाग मतदारसंघातून भाजपा नेते जयंत सिन्हा 4 लाख 79 हजार 548 मतांनी विजयी 

03:14 AM

कन्नौज लोकसभा मतदारसंघात डिंपल यादव यांचा पराभव, भाजपाचे सुब्रत पाठक विजयी 

03:11 AM

भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या प्रज्ञा सिंह 3 लाख 64 हजार 822 मतांनी विजयी 

03:08 AM

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता 70 हजार 875 मतांनी पराभूत 

12:40 AM

भाजपा नेते अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर मतदारसंघातून तीन लाख 99 हजार 572 मतांनी विजयी 

12:12 AM

काँग्रेस नेते शशी थरूर तिरुवनंतपुरम मतदारसंघातून 99 हजार 989 मतांनी विजयी 

12:08 AM

उत्तर-पूर्व दिल्लीमधू मनोज तिवारी आणि उत्तर पश्चिम दिल्लीमधून हंसराज हंस मोठ्या आघाडीसह विजयी 

11:52 PM

दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातून गौतम गंभीर 3 लाख 91 हजार 222 मतांनी विजयी 

11:47 PM

अमेठी मतदारसंघात राहुल गांधी पराभूत

उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघात धक्कादायक निकाल, राहुल गांधी पराभूत, स्मृती इराणी 55 हजार 120 मतांनी विजयी 

11:45 PM

समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव कन्नौज मतदारसंघातून 10 हजार 199 मतांनी पिछाडीवर 

11:43 PM

भाजपा नेते संबित पात्रा पुरी मतदारसंघातून 11 हजार 284 मतांनी पिछाडीवर 

11:14 PM

भाजपा 202 जागांवर विजयी तर 101 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 39 जागांवर तर 13 जागांवर आघाडीवर 

10:51 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि भाजपाचे केले अभिनंदन 

10:06 PM

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दूरध्वनीवरून दिल्या मोदींना शुभेच्छा 

09:08 PM

नवीन पटनाईक यांनी केले भाजपाचे अभिनंदन 

08:20 PM

राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकले - नरेंद्र मोदी 

08:12 PM

हा माझा नाही तर प्रामाणिक देशवासियांचा विजय आहे - नरेंद्र मोदी 

08:09 PM

देशवासियांनी माझ्यासारख्या फकिराची झोळी भरली - नरेंद्र मोदी 

08:06 PM

हा भारताचा आणि लोकशाहीचा विजय - नरेंद्र मोदी 

08:02 PM

यशानंतर मोदी काय म्हणतायत ते पाहा... 

07:59 PM

यंदाच्या निवडणूकीमध्ये सर्वाधिक मतदान - नरेंद्र मोदी 

07:57 PM

भाजपाच्या विजयात मेघराजाचेही आगमन - नरेंद्र मोदी 

07:50 PM

... तर चंद्राबाबू नायडू यांचे खाते उघडले असते - अमित शहा 

07:50 PM

पश्चिम बंगालमधील यशाचा अमित शहा यांच्याकडून खास उल्लेख 

07:45 PM

तामिळनाडूमधील विजय करुणानिधी यांना समर्पित - एम.के. स्टॅलिन 

07:41 PM

विजयानंतर कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारताना नरेंद्र मोदी, पाहा व्हिडीओ... 

07:39 PM

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचे कार्यकर्त्यांसाठी संबोधन, पाहा व्हिडीओ... 

07:37 PM

नरेंद्र मोदी आणि अमित शहा भाजपाच्या मुख्यालयात दाखल 

07:09 PM

कॉंग्रेसच्या मनीष तिवारी यांचा फिरोझपूर येथून विजय 

07:01 PM

गोरखपूरमधून भाजपाच्या रवी किशन यांचा विजय 

06:54 PM

आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' नाहीत 

06:36 PM

राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्तावाचे वृत्त खोटे 

06:32 PM

बऱ्याच देशांमधून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन 

06:03 PM

प्रियंका गांधी यांनी जनतेचे आभार मानत भाजपाचे अभिनंदन केले 

05:49 PM

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरु 

05:21 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले मोदींचे अभिनंदन 

05:18 PM

भाजपाच्या प्रज्ञा सिंग ठाकूर आघाडीवर 

05:14 PM

अभिनेता सनी देओलने गुरदासपूरमध्ये आपल्या पाठिराख्यांची भेट घेतली 

05:04 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रीया... 

05:00 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रीया... 

04:39 PM

उर्मिला मातोंडकरने मानले मतदारांचे आभार 

04:36 PM

वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 8 लाख 38 हजार 371 

04:18 PM

गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेला कौल मान्य, मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया 

04:05 PM

नरेंद्र मोदींनी केले जगनमोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक यांचे अभिनंदन 

03:56 PM

भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे भाजपा मुख्यालयात जोरदार स्वागत 

03:55 PM

लालकृष्ण अडवाणींनी केले नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे अभिनंदन 

03:25 PM

अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर भटिंडा मतदारसंघातून आघाडीवर 

03:24 PM

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन 

02:55 PM

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन 

02:52 PM

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन 

02:22 PM

वायनाडमध्ये राहुल गांधींचा दणदणीत विजय, अधिकृत घोषणा बाकी

वायनाडमध्ये राहुल गांधींना मिळाली 8 लाख34 हजार 181

01:41 PM

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा तुमकूर मतदारसंघातून 20 हजार मतांनी पिछाडीवर 

01:35 PM

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन 

01:18 PM

उत्तर प्रदेश, बंगाल आणि ओदिशामध्ये भाजपाची मुसंडी

भाजपा उत्तर प्रदेशात 55, ओदिशामध्ये 9 आणि पश्चिम बंगालमध्ये 17 जागांवर आघाडीवर 

01:00 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता 31 हजार मतांनी पिछाडीवर 

12:55 PM

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन 

12:32 PM

भाजपा नेते बाबूल सुप्रियो आसनसोल मतदारसंघातून आघाडीवर 

12:25 PM

भाजपाच्या संसदीय मंडळाची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक 

12:24 PM

आघाडी मिळाल्यानंतर भाजपाच्या पश्चिम बंगाल कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष 

11:54 AM

भाजपा नेते जय पांडा ओदिशामधील केंद्रापाडा मतदारसंघातून दोन हजार मतांनी पिछाडीवर 

11:47 AM

केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा आणि मनेका गांधी पिछाडीवर 

11:32 AM

अमेठीमध्ये स्मृती इराणी 7 हजार 600 मतांनी आघाडीवर 

11:19 AM

तामिळनाडूमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर डीएमकेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष 

11:18 AM

काँग्रेस नेते शशी थरूर 13 हजार मतांनी आघाडीवर 

11:14 AM

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 24 तर भाजपा 17 जागांवर आघाडीवर 

11:10 AM

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी 92 हजार 999 मतांनी आघाडीवर 

11:08 AM

जम्मू लोकसभा मतदारसंघात भाजपाचे जुगलकिशोर शर्मा आघाडी 

10:52 AM

ज्येष्ठ नेते शरद यादव मधेपूरा मतदारसंघातून पिछाडीवर 

10:47 AM

भाजपाध्यक्ष अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून सव्वालाख मतांनी आघाडीवर 

10:41 AM

कर्नाटकमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषास सुरुवात 

10:39 AM

शेअर बाजारात मोठी उसळी, सेंसेक्स 40 हजारांच्या पार 

10:15 AM

शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कार्ती चिदंबरम आघाडीवर 

09:50 AM

दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघात भाजपाला आघाडी 

09:40 AM

निवडणूक आयोगांच्या कलांनुसार भाजपा 229 तर कांग्रेस 56 जागांवर आघाडीवर 

09:33 AM

वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी 11 हजार 236 मतांनी आघाडीवर 

09:30 AM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्गा मतदारसंघातून पिछाडीवर 

09:29 AM

भाजपाचे युवा नेते तेजस्वी सूर्या दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून आघाडीवर 

09:27 AM

सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी आघाडीवर

उत्तर प्रदेश - सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या मनेका गांधी आघाडीवर 

09:24 AM

मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनंतर शेअर बाजार वधारला, सेंसेक्स 600 अंकांनी वधारला 

09:22 AM

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपाला 162 तर काँग्रेसला 51 जागांवर आघाडीवर 

09:20 AM

बेगुसरायमध्ये भाजपाचे गिरिराज सिंह आघाडीवर, कन्हैया कुमार पिछाडीवर 

09:18 AM

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली कलांची आघाडी

09:15 AM

काँग्रेसचे नेते शशी थरूर पिछाडीवर

केरळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर तिरुवनंतपुरम मतदारसंघातून आघाडीवर 

09:12 AM

निवडणूक आयोगाच्या अधिकृत कलांनुसार भाजपा 133 तर काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर 

09:09 AM

सोनिया गांधी रायबरेली तर राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून आघाडीवर 

09:08 AM

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशमधील गुणा मतदारसंघातून पिछाडीवर 

08:59 AM

चंदिगड लोकसभा मतदारसंघातून किरण खेर आघाडीवर

चंदिगड - चंदिगड  लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या किरण खेर आघाडीवर 

08:56 AM

भाजपा नेते अनुराग ठाकूर हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर 

08:48 AM

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपा 9 आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर 

08:45 AM

अमेठीमध्ये स्मृती इराणी आघाडीवर

अमेठी - अमेठीमध्ये स्मृती इराणी आघाडीवर, राहुल गांधी पिछाडीवर 

08:36 AM

वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर

वाराणसी - वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर 

08:34 AM

भाजपाध्यक्ष अमित शहा 25 हजार मतांनी आघाडीवर

गांधीनगर - भाजपाध्यक्ष अमित शहा 25 हजार मतांनी आघाडीवर

 

08:32 AM

सुरुवातीच्या कलांमध्ये भोपाळमध्ये प्रज्ञा सिंह आघाडीवर

भोपाळ - सुरुवातीच्या कलांमध्ये भोपाळलोकसभा मतदारसंघामध्ये प्रज्ञा सिंह आघाडीवर, दिग्विजय सिंह पिछाडीवर 

08:31 AM

प्राथमिक कलांमध्ये एनडीएला आघाडी

लोकसभा निवडणुकीचे  मतमोजणीच्या प्राथमिक कल हाती आले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए 22, यूपीए 15 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर 

08:07 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात 

07:44 AM

आसाममध्ये निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण 

07:42 AM

बंगळुरू भाजपाचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास 

07:41 AM

बंगळुरू - नरेंद्र मोदीच बनणार पुढचे पंतप्रधान, कलबुर्गी येथील भाजपा उमेदवार उमेश जाधव यांना विश्वास 

07:39 AM

नवी दिल्ली - लोकसभेचा निकाल काँग्रेसच्याच बाजूने लागेल आणि सत्ता स्थापन करेल - अजय माकन 

07:38 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात 

English summary :
Get live update on election results (Lok Sabha Election 2019) in Marathi: Find party wise and state wise result with winner. Also check vote counting of india’s major satates like Gujrat, rajasthan, bihar, goa. For more latest election news in marathi must check lokmat.com.


Web Title: Lok Sabha Election Result 2019 Live Vote Counting News & Winners, State Wise & Party Wise Results in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.