शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 16:32 IST

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एक्झिट पोलच्या () अंदाजामध्ये पाच राज्य अशी आहेत जिथे भाजपा (BJP) आणि एनडीए (NDA) धक्कादायक कामगिरी करताना दिसत आहे. या पाच राज्यांतील भाजपा  आणि एनडीएच्या मुळे  कामगिरीमुळे इंडिया आघाडीला (INDIA Opposition Alliance) सर्वात मोठा धक्का बसताना दिसत आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबतचा अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोल काल रात्री प्रसिद्ध झाले. या एक्झिट पोलपैकी बहुतांश पोलमधून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएची सत्ता कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होत असल्याचे दिसत होते. मात्र निवडणूक पुढे सरकत गेल्यावर उत्तरोत्तर इंडिया आघाडीचं पारडं जड होत जाताना दिसलं.  एक्झिट पोलमधून एनडीएच्या मोठ्या विजयाचे दावे केले जात आहेत. बहुतांश एक्झिट पोलमधून एनडीएला ३५० ते ४०० पर्यंत जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये पाच राज्य अशी आहेत जिथे भाजपा आणि एनडीए धक्कादायक कामगिरी करताना दिसत आहे. या पाच राज्यांतील भाजपा  आणि एनडीएच्या मुळे  कामगिरीमुळे इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का बसताना दिसत आहे. 

शनिवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलपैकी इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि एनडीएला अनपेक्षितरीत्या जास्त जागा मिळताना दिसत आहेत. आतापर्यंत प्रादेशिक पक्षांचा बोलबाला असलेल्या या राज्यांमध्ये भाजपा प्रबळ होताना दिसत आहे. तसेच एक्झिट पोलमधील हा अंदाज प्रत्यक्षात उतरल्यास तो काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असेल.

आता ज्या पाच राज्यांमधील निकालांमुळे इंडिया आघाडीचं गणित बिघडणार आहे, त्यातील पहिलं राज्य आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये मागच्या निवडणुकीत  जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. मात्र यावेळी भाजपा, तेलुगु देसम आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीने चित्र पूर्णपणे उलटवलं आहे. यावेळी आंध्र प्रगेशमध्ये एनडीएला २१ ते २३ जागा मिळू शकतात. तर वायएसआर काँग्रेसला २ ते ४ जागा मिळू शकतात. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचा एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. 

इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल लागणारं दुसरं राज्य आहे ते म्हणजे ओदिशा. ओदिशामध्ये लोकसभेच्या एकूण २१ जागा आहेत. तसेच ओदिशामध्ये यावेळी भाजपाला बंपर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाला ओदिशामध्ये १८ ते २० जागा मिळू शकतात. तर सत्ताधारी बिजू जनता दलाला ० ते २ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. तर ओदिशामध्ये इंडिया आघाडीला ० ते १ जागा मिळू शकते.  

एक्झिट पोलमधून जबरदस्त धक्कादायक निकालाचा दावा करण्यात आलेलं तिसरं राज्य तेलंगाणा ठरणार आहे. तेलंगाणामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र पाच महिन्यांतच येथील चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या १७ जागा असलेल्या तेलंगाणामध्ये भाजपासा ११ ते १२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसला ४ ते ५ जागा मिळतील, असा दावा करण्यात येत आहे. तर एमआयएमला ० ते १ जागा मिळू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे दहा वर्षे तेलंगाणावर राज्य करणाऱ्या बीआरएसला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही.

इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता असलेल्या राज्यांच्या यादीतील चौथं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय उलथापालथी, पक्षांची झालेली फोडाफोडी यामुळे येथे महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र महाराष्ट्रात काही नुकसान होत असलं तरी महायुती २८ ते ३२ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १६ ते २० जागा मिळू शकतात.

इंडिया आघाडीच्या अपेक्षांवर पाणी फिरवणारं पाचवं राज्य आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये यावेळी  भाजपाला २६ ते ३१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसला ११ ते १४ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि डाव्या पक्षांना ० ते २ जागा मिळू शकतात. मागच्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपाला १८ जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून एनडीएला ३६१ ते ४०१ जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. तर इंडिया आघाडीला १३१ ते १६६ जागा देण्यात आल्या होत्या. तर इतरांना ८ ते २० जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडी