शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

फक्त २ टक्के वाढलेल्या मतांमुळे जिंकता आल्या ७ जागा, ‘तृणमूल’ला फायदा, तर घटलेल्या मतदानामुळे भाजपला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 06:07 IST

West Bengal Lok Sabha Election 2024 Result: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली असून, त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. मतदार भाजपपासून दोन टक्के दूर गेल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली असून, त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. मतदार भाजपपासून दोन टक्के दूर गेल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला आहे. मात्र, अल्पसंख्याक मतदारांवरील ममता बॅनर्जी यांची मोहिनी कायम असल्याचे दिसून आले. मात्र, काही ठिकाणी डावे पक्ष-काँग्रेस आघाडीकडे अल्पसंख्याक मते वळल्यामुळे भाजपचा फायदा झाल्याचे चित्र दिसून आले. 

बंगालच्या ४२ जागांपैकी यावेळी ‘तृणमूल’ने २९ जागा जिंकल्या आहेत. अनेक एक्झिट पोल्सनी तृणमूलच्या मतांच्या टक्केवारीमध्ये ७ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो प्रत्यक्षात आलेला नाही. भाजपने मागील निवडणुकीपेक्षा दोन टक्के मते कमी मिळविली असली तरी त्यांना त्यामुळे सहा जागा गमवाव्या लागल्या आहेत.

गंगेच्या मैदानी क्षेत्रातही परिणामतृणमूल काँग्रेसने गंगेच्या मैदानी क्षेत्रातही आपला प्रभाव कायम ठेवला आहे. या भागामध्ये असलेल्या लोकसभेच्या १६ पैकी १४ जागा तृणमूलकडे गेल्या आहेत. मागील वेळी भाजपने या विभागातील तीन जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी एक जागा तृणमूलने ओढून घेतली आहे. जंगली आणि आदिवासी भागातील आठपैकी चार जागा तृणमूलने जिंकल्या.

अल्पसंख्याक मतांचा प्रभावपश्चिम बंगालमध्ये १६ ते १८ लोकसभा जागांवर अल्पसंख्याकांच्या मतांचा प्रभाव पडतो. रायगंज, कूचबिहार, बालूरघाट, माल्डा उत्तर आणि दक्षिण, मुर्शिदाबाद, डायमंड हार्बर, उलुबेरिया, हावडा, बीरभूम, कांथी, तामलूक, मथुरापूर आणि जॉयनगर या मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी आहे. यापैकी बालूरघाट, माल्डा उत्तर आणि रायगंज या जागा भाजपने राखल्या आहेत. या तीनही जागांवर डावे-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली मते ही भाजप उमेदवाराच्या आघाडीपेक्षा पुष्कळच जास्त असल्यामुळे येथील मतविभाजनाचा फायदाच भाजपला झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा