शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 11:48 IST

Chhattisgarh Lok Sabha Election 2024:  काँग्रेसने (Congress) यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामधील काही आश्वासनांवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार वार-पलटवार होत आहेत. या क्रमात आता महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा (Alaka Lamba) यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलना ही थेट रावणाशी केली.

 काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामधील काही आश्वासनांवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार वार-पलटवार होत आहेत. या क्रमात आता महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलना ही थेट रावणाशी केली. रावणाने सीतेचं हरण केलं होतं. तर नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि मजुरांच्या अधिकारांचं हनन केलं. आमच्या मंगळसुत्राची चिंता करू नका. बेरोजगारीची चिंता करा.

छत्तीसगडमधील दुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र साहू यांचा प्रचार करण्यासाठी अलका लांबा इथे आल्या होत्या. त्यावेळी लांबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. केंद्रातील मोदी सरकारच्या सगळ्या योजना अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा केवळ एकाच रंगासाठी मत मागत आहेत. मात्र काँग्रेस तीन रंगांनी बनलेल्या तिरंग्यासाठी मत मागत आहे, असे सांगितले.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना करताना त्या म्हणाल्या की, लोक रावणाला मोठा ब्राह्मण मानतात. मात्र मला वाटतं रावणामध्ये १० दोष होते. त्याने सीतामातेचं अपहरण केलं. मर्यादा पुरुषोत्तम राम आणि संपूर्ण लंका सीतामातेसाठी सर्वस्वाचा त्याग करून लढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गरीब, मजुरांच्या अधिकारांचं हनन करून ते त्यांच्या धनाढ्य मित्रांकडे सोपवत आहेत.  आता मी कुणासाठी काय म्हटलंय, हा फरक तुम्ही समजून घ्या, असे अलका लांबा म्हणाल्या.

यावेळी अलका लांबा यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यावरूनही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत भ्रम पसरवत आहेत. आमच्या न्याय पत्राच्या एकाही पानावर हिंदू-मुस्लिम, दहशतवादाचं समर्थन आणि मुस्लिम लीग यासारखा एकही शब्द नाही आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :chhattisgarh lok sabha election 2024छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४