शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

राहुल आणि प्रियंका गांधी या मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, UP-बिहारमधील ४० जागांवर काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:56 IST

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किमान ३० ते ४० जागांवर काँग्रेसकडून दावेदारी ठोकण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मतदारसंघही काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये होणाऱ्या जागावाटपाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किमान ३० ते ४० जागांवर काँग्रेसकडून दावेदारी ठोकण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मतदारसंघही काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले आहेत. राहुल गांधी रायबरेली येथून तर प्रियंका गांधी अमेठी येथून स्मृती इराणी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसांमध्याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, बिहारमधील सुमारे १५ ते २० जागांवर काँग्रेसकडून महाआघाडीमध्ये दावेदारी करण्यात आली आहे. या जागांवर तारिक अन्वर, अखिलेश प्रसाद सिंह, कन्हैया कुमार, शकील अहमद खान आणि राज्यसभा खासदार रंजीत रंजन या नेत्यांना लढवलं जाण्याची शक्यता आहे. 

इंडिया आघाडीतील बदलत्या समिकरणांदरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस नेत्यांनी जागावाटपाबाबत नव्याने चर्चा सुरू केली आहे.  उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुक्रमे आरएलडी आणि जेडीयूने साथ सोडल्यानंतर कांग्रेसला अधिका जागा मिळाल्या पाहिजेत, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. दरम्यान, काँग्रेसने समाजवादी पक्षाकडे आपल्या २० उमेदवारांच्या नावांची यादी सोपवली आहे, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील अमेठी, राय बरेली, कानपूर, बलिया, बाराबंकी, मेरठ, महाराजगंज, रामपूर, सहारनपूर, झाशी, फतेहपूर सिक्री, जालौन, बासगांव आणि बिजनौरसारख्या जागांवर दावा केला आहे. जागावाटपाबाबत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. सध्या केवळ ५ ते ६ जागांवरच  सहमती बनली आहे. मात्र काँग्रेस आणि सपामध्ये १५ ते २० जागांवर एकमत होईल, असं बोललं जात आहे.

त्याचप्रमाणे भाजपाने बिहारमध्येही १५ ते २० जागांवर दावेदारी केली आहे. काँग्रेसकडून सुपौल, सासाराम, समस्तीपूर, मधुबनी, दरभंगा, बेगुसराय, पूर्ण चंपारण्य, पटना साहिब, झंझारपूर, किशनगंज, औरंगाबाद, गोपालगंज, कटिहार आमि अररिया या जागांसाठी काँग्रेस आणि आरजेडीमध्ये चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी