शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी काँग्रेसचा खेळ बिघडवणार, आता या दोन राज्यात उमेदवारांची घोषणा करणार! असा आहे प्लान! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 15:46 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांमध्ये तृणमूल पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. अर्थात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा तृणमूलचा प्लॅन आहे.

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील मतभेद अद्यापही संपताना दिसत नाहीत. तृणमूल काँग्रेसपश्चिम बंगालनंतर आता मेघालयच्या तुरा लोकसभा जागेसाठी आणि आसाममधील जागांसाठी लवकरच आपले उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. लवकरच तिकीटाचीही घोषणा होईल, असा दावा केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांमध्ये तृणमूल पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. अर्थात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा तृणमूलचा प्लॅन आहे.

टीएमसीकडून मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना तुरा लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने यापूर्वीच ए. संगमा यांना येथून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी, काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आघाडी व्हावी यासाठी तुरा मतदारसंघ तृणमूलला देण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊ शकली नाही.

2019 मध्ये असा होता निकाल -2019 च्या लोकसभा निवडणुकीत, मुकुल संगमा काँग्रेसमध्ये होते, त्यांना तुरा मतदार संघातून 41.24 टक्के मते मिळवली होती. मात्र, एनपीपीच्या अगाथा संगमा यांच्याकडून त्यांचा 64 हजार मतांनी पराभव झाला होता. यानंतर मुकुल संगमा काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये दाखल झाले होते.

TMC मेघालयातील शिलाँग मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही -TMC सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मेघालयात उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. मात्र, पक्षाने शिलाँगमधून निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे. सध्या काँग्रेसचे व्हिन्सेंट एच पाला हे येथील विद्यमान खासदार आहेत. याशिवाय TMC आसाममध्येही 2-4 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून राज्यातील नेते यासंदर्भात निर्णय घेतील, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस