प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 19:13 IST2024-01-16T19:12:43+5:302024-01-16T19:13:02+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून खास व्युहरचना आखण्यात येत आहे.

प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून खास व्युहरचना आखण्यात येत आहे. आता भाजपाकडून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक गावाकडे चला अभियान सुरू करण्यात येणार आहे. हे अभियान जवळपास ४० दिवस चालणार आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून भाजपा १ लाख ४० हजार गावांपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक गावाकडे चला अभियानाच्या माध्यमातून भाजपा नेते गावोगावी जाऊन लोकांशी थेट संपर्क साधणार आहेत.
प्रत्येक गावाकडे चला अभियानाच्या माध्यमातून भाजपाचे नेते गावोगावी जाणार आहेत. तसेच तिथे बैठका घेणार आहेत. या बैठकांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती जनतेला दिली जाणार आहेत. त्याशिवाय सरकार जनतेसाठी आणखी काय करू शकतं याबाबत गावातील लोकांचं मतही विचारात घेणार आहेत. तसेच या अभियानादरम्यान गावोगावी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची माहितीही भाजपा नेते जनतेला देतील.
भाजपाचं प्रत्येक गावात चला अभियान जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील १ लाख ४० हजार गावांमध्ये भाजपाचे नेते पोहोचतील. तसेच ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधणार आहे. दररोज प्रत्येक जिल्ह्यातील ५ ते ८ गावांना भेट देण्याची भाजपाची रणनीती आहे. यात लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदांच्या विकसित भारत संकल्पाबाबत माहिती दिली जाईल.
भाजपाचं हे अभियान आगामी निडणुकीत गेमचेंजर ठरू शकतं, असा दावा केला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी मतदारांशी थेट संपर्क साधला जाणार आहे. तसेच त्यांनी लाभ घेतलेल्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्याशिवाय प्रत्येक गावात चला या मोहिमेमधून १ लाख ४० हजार गावांतील लोकांपर्यंत थेट संपर्क साधला जाणार आहे. त्याचाही थेट फायदा भाजपाला होऊ शकतो.