शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 16:21 IST

कंगनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथ पत्राच्या माध्यामाने तिच्या संपत्तीसंदर्भातील माहितीही समोर आली आहे. उमेदवारी अर्जासोबतच दाखल केलेल्या शपथपत्रात तिने आपल्या संपत्तीसंदर्भात माहिती दिली आहे. 

बॉलीवुड अभिनेत्री तथा भाजप उमेदवार कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कंगनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथ पत्राच्या माध्यामाने तिच्या संपत्तीसंदर्भातील माहितीही समोर आली आहे. उमेदवारी अर्जासोबतच दाखल केलेल्या शपथपत्रात तिने आपल्या संपत्तीसंदर्भात माहिती दिली आहे. 

कंगनाने शपथपत्रात दिलेल्या महातीनुसार, तिच्याकडे एकूण 91 कोटी 50 लाख रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. यात एकूण 28.73 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. तर 62.92 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. महत्वाचे म्हणजे, कंगनाकडे एलआयसीच्याही 50 पॉलिसी आहेत. यात दहा-दहा लाख रुपयांच्या 49 पॉलिसी आहेत. तर पाच लाख रुपयांची एक पॉलिसी आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व पॉलिसी तिने एकाच दिवसात म्हणजेच 4 जून, 2008 रोजी घेतल्या आहेत. याशिवाय कंगनाने 1.20 कोटी रुपयांचे कॅपिटल इनवेस्टमेंट देखील केले आहे.

कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे आणि सोनं -कंगनाने तिच्या निवडणूक शपथपत्रात आपण 12वी पास असल्याचे म्हटले आहे. कंगनाकडे अनेक सोन्या-चांदीचे दागिने आहेत. तिच्याकडे 6 किलोहून अधिक सोने आहे. या सोन्याची किंमत पाच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. कंगनाकडे 3 कोटींचे हिरेही आहेत. याशिवाय तिच्याकडे 50 लाख रुपयांची साठ किलो चांदीही आहे.

महागड्या वाहनांपासून स्कूटरही -कंगनाला महागडी वाहनंही आवडतात. सध्या त्याच्याकडे दोन मर्सिडीज आहेत. तिच्याकडे 58 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ आणि 3.91 कोटी रुपयांची मर्सिडीज मेबॅक आहे. याशिवाय तिच्याकडे 98 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार आणि 53 हजार रुपयांची व्हेस्पा स्कूटरही आहे. एवढेच नाही तर, कंगनाने तिच्या नातलगांनाही कोट्यवधी रुपये कर्जाच्या म्हणूनही दिले आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाElectionनिवडणूक 2024Himachal Pradeshहिमाचल प्रदेश